*पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचा पालघर जिल्ह्यात दणका … 1 कोटी 6 लाख 72 हजारांचा ऐवज केला जप्त
टाईम्स 9 मराठी न्युज
पालघर जिल्हा प्रतिनिधी
विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दापचरी टोलनाक्यानाजीक विदेशी दारूने भरलेला ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे. मात्र ट्रकचालक या कारवाईदरम्यान पळून जाण्यात यशस्वी झाला असला तरी पालघर जिल्ह्याच्या इतिहासातील पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या कारकिर्दीतील विदेशी दारूवरील ही सर्वात मोठी आणि पहिली मोठी कारवाई आहे. पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना पोलीस खबरी यांच्याकडून गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. या मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी दापचारी टोलनाक्यानजीक सापळा रचून पाळत ठेवली होती. यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तसेच तलासरी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हरियाणावरून मुंबईमार्गे गुजरातला जाणारा विदेशी दारूचा हा ट्रक मंगळवार दिनांक 12 मार्च 2024 रोजी पकडला आहे .या ट्रकमध्ये (1100) अकराशे पेट्यांत हे विदेशी मद्य होते. ट्रक खाली करून त्याचा हिशेब करण्यास पोलिसांना सात-आठ तास लागले. सेल फॉर पंजाब असे लिहिलेले मद्य हरयाणाहून मुंबईमार्गे गुजरातला आणि तिथून पंजाब येथे हा ट्रक जाणार होता. ही बेधडक यशस्वी कारवाई स्वतः उपस्थित राहून पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अनिल विभुते, पोलिस उपनिरीक्षक गणपत सुळे, राजपूत, बजरंग अमंडवाड, तलासरीचे सहायक पोलिस निरीक्षक देवरे, उपनिरीक्षक चौधरी, मुंडे यांनी केली आहे.