विशेष

रमजानुल मुबारक – २ तरावीहची नमाज एक अपूर्व संधी

रमजान महिन्यात सर्वत्र भक्तांची मांदियाळी दिसून येते.मशिदी भरुन गेलेल्या असतात. अनेकांना नमाज आदा करण्यासाठी जागा ही मिळत नाही.रात्रीची तराविहची नमाज या महिन्यात विशेष करून आदा केली जाते. यामध्ये दररोज वीस रकअतमध्ये कुरआन शरीफचे पठन केले जाते.संपूर्ण कुरआन शरीफ मुखोदगत असलेले हाफिज या नमाजची ईमामत करतात.तरावीहच्या या नमाजमध्ये महिनाभरात संपूर्ण कुरआन शरीफचे वाचन व पठन पूर्ण केले जाते.वर्षातून किमान एकदा कुरआन शरीफचे पठन करणे आवश्यक मानले जाते.परंतु मानवाने स्वतःला दैनंदिन कार्य व व्यवहारात स्वतःला एवढे गुरफटून टाकले आहे कि देवाधर्मासाठी त्याच्याकडेे वेळच नाही. अशा लोकांसाठी तरावीह ही एक पर्वणी आहे.तिचा प्रत्येकाने लाभ घेण्याचा प्रयल करावा व आपल्याकडून झालेल्या चुकांचे परिमार्जन करुन घ्यावे.दैनंदिन जीवनातीत भौतिक सुविधा प्राप्त करण्याच्या नादात माणूस अध्यात्मापासून दूर गेला आहे.म्हणूनच त्याला जिथं संधी मिळेल तिथं धार्मिक कार्यकमांना हजेरी लावून परमार्थ साधण्याचा तो प्रयल करीत असतो. रमजान महिन्यातील होणारी गर्दी ही याचाच एक भाग आहे.कुरआन पठन ऐकण्याची संधी तरावीह नमाजच्या माध्यमातून मिळत असल्याने या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा हे आपल्याच हिताचे आहे.मूळ कुरआन हे अरबी भाषेत आहे ते समजून घेण्यासाठीजगातील प्रत्येक भाषेत त्याची भाषांतर उपलब्ध आहे आपापल्या मातृभाषेतून ते समजून घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे.(क्रमशः)*सलीमखान पठाण* 9226408082.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button