शहर

पोलिसांच्या लाठीचार्ज मध्ये जखमी झालेल्या भिम सैनिकांची प्रा.जोगेंद्र कवाडे सरांनी घेतली रुग्णालयात भेट

प्रतिनिधी:- मायाताई सागर पाईकराव यवतमाळ

अमरावती जिल्ह्यातील पांढरी( खानापूर) या गावात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या शांततामय आंदोलनाच्या दरम्यान दिनांक 11 मार्च रोजी अमरावतीत आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला असल्याच्या पार्श्वभूमीवर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा जोगेंद्रजी कवाडेसर यांनी अमरावती येथे भेट दिली.

भेटी दरम्यान सकाळी 11 वाजता प्रथम जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी भीमसैनिकांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर 12 वाजता जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर लगेच 12.30 वाजता अमरावती चे पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन लाठीचार्ज प्रकरणात योग्य चौकशी करून निरपराध आंदोलकांवर कारवाई केल्या जाऊ नये,विशेषता विद्यार्थी व महिलांवर कार्यवाही होऊ नये अशी मागणी केली. त्यानंतर दुपारी 1.00 वाजता शासकीय विश्रामभवन येथे पत्रकार परिषद घेऊन संबंधित प्रवेशद्वाराच्या संदर्भाने आणि झालेल्या अमानुश लाठीचार्ज संदर्भाने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आदरणीय कवाडेसरांनी आपली भूमिका विषद केली.

यावेळी कवाडे सरांसोबत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष चरणदासजी इंगोले,जिल्हाध्यक्ष विलास पंचभाई,पश्चिम विदर्भ अध्यक्ष प्रा डी के वासनिक,डीजे खडसे गुरुजी, शहर कार्याध्यक्ष वासुदेव सामटकर,बाळासाहेब इंगोले,भास्कर वराडकर,डॉ.अशोक गुर्जर,साहेबराव वानखडे श्रीकृष्ण पळसपगार,प्रदीप ढेंबरे,श्रीकृष्ण शेंडे,सुरेश बहादुरे,मुकुंद रंगारी,अण्णा कांबळे, प्रकाश रंगारी,जानराव वाटाणे,रोशन मोहोड,साहेबराव वानखडे,गंगाधर खडसे,भीमराव मोहोळ,प्रकाश डेरे,रामेश्वर इंगळे,मुकुंद ढोके, दीपक आठवले, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button