पालघर जिल्ह्यातील डहाणू सेंट मेरीज हायस्कूलच्या 13 वर्षीय तनिष्का पटेल हिची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावर निवड
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
पालघर जिल्ह्यातील डहाणू सेंट मेरीज हायस्कूलमध्ये इयत्ता आठवी मध्ये शिकणाऱ्या 13 वर्षीय कुमारी तनिष्का दीपक पटेल हिची सोलापूर येथे झालेल्या 17 वर्षाखालील मुलींच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे.कुमारी तनिष्का दीपक पटेल ही पालघर जिल्ह्यातील डहाणू आगर येथील रहिवासी आहे.
तिला लहानपणापासूनच क्रिकेट या खेळाची आवड आहे. ती राईट हॅन्ड तेज गोलंदाज आहे.
तिने तिचे शालेय क्रीडा शिक्षक लक्ष्मीकांत भंडारी, धनंजय पाटील, नेल्सन रोजारियो, सेड्रिक डिसोझा यांच्याकडून क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले आहे.
सोलापूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील सेंट मेरीज हायस्कूलच्या मुलींच्या क्रिकेट संघाने सोलापूर येथे झालेल्या 17 वर्षाखालील मुलींच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.
यात तनिष्का पटेल हिची राज्यस्तरावर निवड झाल्यामुळे सेंट मेरीज हायस्कूल डहाणू सहसचिव हेमंत पांचाळ,संचालक डॉ. अमरदीप सिंग मारवाह, मुख्याध्यापक सिरील लोपीस, पर्यवेक्षिका नीता वास व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी व डहाणू येथील नागरिकांनी तिचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.