जगन्नाथ शिंदे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक: 7030516640
एआय ओसीडी आणि एमएस सी डीएचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त पालघर जिल्ह्यात नालासोपारा, पालघर, बोईसर, डहाणू, मोखडा या ठिकाणी शुक्रवार दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी भव्य अश्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरास बोईसर विधानसभेचे माजी आमदार राजेश पाटील यांनी आवर्जून उपस्थित राहून मार्गदर्शन केले आणि रक्तदात्यांनी प्रमाण पत्र देऊन सन्मानित केले . समाजाच्या कल्याणासाठी कटिबद्ध असलेली ही फार्मासिटीकल संघटना केमिस्ट आणि वितरक नेटवर्किंगच्या द्वारे संपूर्ण भारतभरात सुमारे 75000 युनिट रक्त दान करण्याचे त्यांचे माहितीपूर्ण योगदान असणार आहे. तसेच शगुन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बोईसर येथे 1000 युनिटचे त्यांचे योगदानाचे उद्दिष्ट असणार आहे.
माजी आमदार राजेश पाटिल यांनी यावेळी आयोजकांना आणि रक्तदात्यांना शुभेच्छा दिल्या. समवेत पालघर जिल्हा केमिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष अनिस शेख, नालासोपारा केमिस्ट असो.चे अध्यक्ष नाहरसिंगजी, प्रकाश मिश्रा, सोहनलाल चौधरी,दिलीप यादव, रमेश चौधरी,साधना त्रिपाठी यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.