प्रविण रोहिदास पाटील अभियांत्रिकी महाविद्यलयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय रहिवाशी शिबिराचे विराथन बुद्रुक सफाळे येथे आयोजन
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक – 7030516640
भाईंदर स्थित एस. एन. एज्युकेशन ट्रस्टच्या मुंबई विद्यापीठ संलग्न प्रविण रोहिदास पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे पहिले सात दिवसीय रहिवाशी शिबीर विराथन बुद्रुक सफाळे पालघर येथे दिनांक 19 जानेवारी ते 25 जानेवारी 2025 रोजी यशस्वीरित्या संपन्न होत आहे .
या शिबिरामध्ये महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून त्याद्वारे विद्यार्थ्यांमंध्ये समाजाभिमुख विविध उपक्रम श्रमदान, परिसर स्वच्छता, वृक्षारोपण, सामाजिक जनजागृती पथनाट्य तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगा, ध्यानधारणा, शारीरिक व्यायाम, चर्चासत्र, व्याख्यानमाला, सांस्कृतिक कार्यक्रम यांचे यशस्वीरित्या उपक्रम राबविले जात आहेत . सदर शिबिरामध्ये विराथन परिसरातील जिल्हा परिषद शाळा, दवाखाना, ग्रामपंचायत कार्यालय, धार्मिकस्थळे, अभिनव विद्यामंदिर व मानव आणि परिसर विकास समिती मध्ये वरील उपक्रम राबविण्यात आले.
महत्वाच्या सामाजिक समस्यांबद्दल जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने साक्षरता, शिक्षणाचे महत्त्व, तंटामुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छतेचे महत्त्व, जल संधारण, प्लास्टिक बंदी, कचरा व्यवस्थापन, सायबर सुरक्षा, क्षयरोग निर्मूलन या विषयावर पथनाट्य सादर करण्यात केली जात आहेत . अश्याप्रकारे विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना, नेतृत्व क्षमता, संवादकौशल्य, सामाजिक भान व समाजाचा विकास हेच विद्यार्थ्यांचे ध्येय हा राष्ट्रीय सेवा योजनेचा मूलमंत्र साध्य होत आहे.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे रोहिदासजी पाटील (संस्थापक, अध्यक्ष एस. एन. एज्युकेशन ट्रस्ट), मा. श्री. महेशजी म्हात्रे (सचिव), सौ. रंजना पाटील (सीईओ), डॉ. देविचंद राठोड (प्राचार्य), शरद घरत (माजी सरपंच, विराथन बुद्रुक ग्रामपंचायत ), प्रा. जीवन विचारे (जिल्हा समन्वयक), प्रा अरुणा गुजर (विभाग समन्वयक) व प्रा. जितेंद्र इंगळे (युनिट समन्वयक), कु. ललित कुमावत (राष्ट्रीय सेवा योजना युनिट सचिव) यांच्या मार्गदर्शन व समन्वयाने संपन्न होत आहे.