पश्चिम रेल्वेच्या सफाळे रेल्वे फाटकात इयत्ता दहावीत शिकणाऱ्या पंधरा वर्षीय मुलीचा अपघात होऊन मृत्यू
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640
पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील 15 वर्षीय इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा गुरुवारी दुपारी सफाळे रेल्वे फाटकात अपघात होऊन तिचा जागीच मृत्यू झाला आहे.
वैष्णवी रावल असे या मुलीचे नाव असून ती इयत्ता 10 वी मध्ये लटे चंद्रप्रभा चित्ररंजन शॉप इंग्लिश मिडीयम हायस्कूल सफाळे या हायस्कूलमध्ये शिकत होती.गुरुवार दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी ती दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ती राहत असलेल्या नाईन स्टार कृतिका बिल्डिंग पंडित पाडा सफाळे पश्चिम इथून सफाळे दिशेने रेल्वे क्रॉस करून सफाले पूर्व येथे क्लासला जात होती.
यावेळी सफाळे रेल्वे येथून ती पूर्वेकडे जाण्यासाठी रेल्वे फाटक क्रॉस करत असताना पश्चिम एक्सप्रेस या गाडी खाली तिचा अपघात होऊन जागीच मृत्यू झाला आहे. यावेळी तिच्या कानात इयरफोन चालू असल्यामुळे तिला गाडीच्या हॉर्नचा आवाज न आल्यामुळे तिचा अपघात होऊन मृत्यू झाला आहे.
ही मुलगी मूळची राहणारी गुजरात येथील असून ती काही वर्षापासून नाईन स्टार पंडित पाडा कृतिका बिल्डिंग येथे आपल्या कुटुंबीयान सोबत राहत होती.