माजी आमदार हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांच्या अथक प्रयत्नामुळे जलसार ते विरार म्हारंबळ पाडा जलमार्ग मार्च-एप्रिल 2025 मध्ये वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पालघर जिल्ह्यातील सफाळे जलसार ग्रामपंचायत हद्दीतून जलसार ते विरार म्हारंबळ पाडा हा जलमार्ग उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
हे संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी 2025 मार्च ते एप्रिल महिन्याचा कालावधी लागणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर हा जलमार्ग प्रवाशांना प्रवासासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर व माजी आमदार क्षितीज ठाकूर यांच्या अथक प्रयत्नातून पालघर जिल्ह्यातील विरार- म्हारंबळपाडा ते सफाळे जलसार जलमार्गावर रोल ऑन रोल ऑफ (रो-रो) या सेवेची सुरुवात मार्च एप्रिल 2025 रोजी होणार आहे.यामुळे आता सफाळे विरार हा 2 तासाचा प्रवाशांचा जीव घेणारा प्रवासी रस्ता अवघ्या अर्धा तासात सुलभ व सुखद होणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्ग आणि सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्यांचे जाळे तयार होत असतानाच जलमार्गाचा पर्याय अधिक बळकट करण्यासाठी वसई भाईंदर रो-रो सेवेचा विस्तार आता विरार सफाळ्या पर्यंत करण्यात आला आहे.वसई भाईंदर रो-रो सेवेने सुरुवातीला वसई भाईंदर मध्ये चांगला प्रतिसाद मिळवला असला तरी मात्र बोटींची कमतरता असल्यामुळे प्रवाशांना हा प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सध्या वसई भाईंदर या जलमार्गावर प्रवाशांना प्रवास करण्यासाठी एकच बोट उपलब्ध असल्या कारणामुळे सरकारने या जलमार्गावर लवकरात लवकर अन्य बोटीची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
सफाळे जलसार ते विरार-म्हारंबळपाडा या जलमार्गाने अवघ्या अर्धा तासात विरार येथे प्रवाशांना जाता येणार आहे.यामुळे डहाणू पालघर,बोईसर,सफाळे, केळवा रोड उंबरोळी,, वाणगाव आणि संपूर्ण पालघर जिल्ह्यातील प्रवाशी वर्ग, भाजीविक्रेते, दूध व्यवसायिक मुंबईकडे प्रवास करण्यासाठी हा मार्ग एक सुलभ व सुखद मार्ग म्हणून पालघर जिल्ह्यातील प्रवासी या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतील..
बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे सुपुत्र माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी विरार म्हारंबळ पाडा ते सफाळे या जलमार्गाच्या विकास उभारणीसाठी घेतलेला पुढाकार वाखाण्यासारखा आहे.त्यांच्या या प्रयत्नांमुळे संपूर्ण पालघर जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.