सुतगिरणी कामगाराचा मुलगा संतोष अर्जुन टकले झाला कृषी सहाय्यक अधिकारी
(प्रतिनिधी) राजेंद्र भगवान भोईर
(मो.9028305319)
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र सरळ सेवा २०२३ मार्फत घेण्यात आलेल्या कृषी सहाय्यक (महाराष्ट्र कृषी विभाग) घेण्यात आलेल्या परीक्षेत चिंचोली (ता.सांगोला) येथील चिरंजीव संतोष अर्जुन टकले यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण पूर्ण करून अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली आणि यश संपादन केले. संतोष टकले चे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चिंचोली ता. सांगोला एका छोट्या गावात झाले,

तर ११ वी व १२वी त्यांनी शिवणे माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज मधून केले. डिग्री डॉ.बुधाजीराव मुळीक कॉलेज ऑफ ॲग्रीकलचर इंजिनियरींग ॲन्ड टेक्नोलोजी मांडकी , ता. चिपळूण येथून केले. डिग्री पूर्ण केल्यावर एमबीए व बी.टेक चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर बी.एड देखील महात्मा फुले शिक्षणशास्र महाविद्यालय , सांगोला येथे केले. पुढे एमपीएससी अभ्यास पुण्यात केला. घरची परिस्थिती बिकट असताना देखील त्यांनी शिक्षण चालु ठेवले, आणि यश संपादन केले. ऐवढेच नाहीतर आता ते मुंबई युनिव्हर्सिटीतून एलएलबी करत आहेत. संतोष टकले हे एक राष्ट्रीय खो-खो खेळाडू असुन याची महाराष्ट्र शासनाच्या कृषी सहाय्यक पदी खेळाडू कोट्यातून निवड झाली आहे.

त्याच्या या यशामागे त्याचे वडील श्री.अर्जुन टकले ,आई सौ.शालन टकले, त्याच्या या यशाबद्दल समस्त टकले परिवार,नातेवाइक, समस्त ग्रामस्थ चिंचोली (सांगोला ) आणि परिसरातील राजकीय, सामाजिक अशा सर्व स्तरातून अभिनंदन करुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.
“केल्याने होत आहे आधी केलेच पाहिजे” या उक्ती प्रमाणे संतोषने जे प्रयत्न आपल्या शिक्षणा नंतर दाखवले .



