शहर
अकलूज येथील शांतता व समन्वय समितीचा निर्णय…उद्या दुपार पर्यंत अकलूज बंद ची घोषणा…

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
भारतीय आर्मी मध्ये कार्यरत असताना वेस्ट बंगाल येथे ईलाक्षीनगर गिरझणी-अकलूज येथील वीरसुपुत्र रहिवासी नाईक लक्ष्मण संजय पवार हे शहीद झाले.त्यांचे पार्थिव उद्या पोहचत आहे.शासकीय इतमामात अंत्यविधी उद्या गिरझणी,अकलूज येथे संपन्न होत आहे…

आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या शूर वीरांचे बलिदान,शौर्य आणि त्यांची कर्तव्यनिष्ठा ही आम्हांस प्रेरणादायी आहे…

त्याप्रती कृतज्ञता आणि श्रद्धांजली अर्पण करणेसाठी अकलूज परिसरातील उद्या शुक्रवार दि.१६ मे २०२५ दुपारी ठीक २ वाजेपर्यंत दैनंदिन व्यवहार बंद ठेऊन आपल्या विरसुपुत्राला श्रद्धांजली अर्पण करावी.याची नोंद घेऊन अकलूज पंचक्रोशीतील उद्योजक,व्यापारी आणि नागरिकांनी दैनंदिन व्यवहार दुपारपर्यंत बंद ठेऊन सहकार्य करावे.हि विनंती.

आपला,
शिवतेजसिंह मोहिते-पाटील



