विशेष

करमाळा न्यायालय परिसरात बालिका दिवस व मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रम संपन्न

करमाळा प्रतिनिधी

अलीम शेख

मोबाईल नंबर 98 50 68 63 60

आज दि. २४/०१/२०२४ रोजी दुपारी २.३० वा. करमाळा येथील न्यायालय परिसरात बालीका दिवस व मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमास विधी सेवा समिती अध्यक्षा तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर करमाळा सौ. एम. पी. एखे साहेब तसेच सह दिवाणी न्यायाधीश साहेब श्री. आर. ए. शिवरात्री उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना बालीका दिवस दिनानिमित्त मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अँड. अक्षय वीर यांनी लैंगिक छळ या विषयावर मार्गदर्शन केले. कु. समिक्षा मेंढापुरे. व कु. वैष्णवी भोसले या विद्यार्थ्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयावर भाषण केले. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या विषयावर प्रा. प्रदीप मोहिते सर यांनी मार्गदर्शन केले. अँड. बी. टी. हिरडे सार्वजनिक उपयोगिता सेवा आणि केंद्र राज्य सरकारच्या योजना याबाबत मार्गदर्शन केले. पांडे येथील जि. प. शाळेतील शिक्षक गबाले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमास बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. डी. एम. सोनवणे व बारचे सदस्य उपस्थित होते. उपस्थित सर्व लोकांचे आभार प्रदर्शन अँड. जे. डी. देवकर यांनी केले.सदर कार्यक्रमावेळी दिवाणी न्यायाधीश साहेब व. स्तर, करमाळा सौ. एम. पी. एखे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करताना त्याचे महत्त्व समजावून सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button