करमाळा येथील नगरसेविका यांनी केलेल्या अतिक्रमणाच्या विरोधात करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल कुंभार दिनांक 26 जानेवारी रोजी करणार आत्मदहन

करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथील नगरसेविका यांनी सरकारी जागेत केलेल्या अतिक्रमणाच्या संदर्भात आत्मदहन करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते विशाल कुंभार यांनी दिला आहे करमाळा कुंभारवाडा जवळील खंदक रोडवर नगरसेविकासीमा रामदास कुंभार यांचे पती श्री रामदास कुंभार व मुलगा डॉक्टर रोहन कुंभार आणि मनोज कुमार यांनी नगरसेवक पदाचा गैरवापर करून सदर जागेतील वृक्ष तोडून त्या जागेवर अतिक्रमण केलेल्या असून त्या जागेवर

बांधकाम करून बिहार युवकांना भाड्याने दिले आहे शासनाच्या जागेवर अतिक्रमण करून सत्तेचा गैरवापर करणाऱ्या नगरसेवक व त्यांच्या कुटुंबीयांना कारवाई करण्यात यावी तसेच सदर केलेला अतिक्रमण नगरपालिकेने तात्काळ पाडावे यासाठी मी वेळोवेळी प्रशासनाचा पाठपुरावा केला परंतु प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही त्यासंदर्भात प्रशासनाने दखल घेण्यात यावी व प्रशासन जागे व्हावे म्हणून मी प्रजासत्ताक दिन नगरपालिकेच्या समोर आत्मदहन करणारा असून करमाळा नगरपालिका व प्रशासन अशा अनेक गैर कारवाईंना पाठीशी घालत आहे व करमाळा शहरात अशा अनेक अतिक्रमण झालेले आहेत जर शासनाने त्वरित कारवाई नाही केली तर मी 26 जानेवारी रोजी आत्मदहन करेल असा असे वृत्त श्री विशाल कुंभार यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली