महागांव पोलिसांचे वरळी मटका ..जुगारावर धाड सत्र सुरु ..मटका चालकांचे धाबे दणानले
प्रतिनिधी मायाताई सागर पाईकराव यवतमाळ
महागाव पोलीस स्टेशन हद्दीत चालु असलेल्या वरळी मटका जुगाराच्या अड्यावर पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली पोलिसांनी धाड सत्र सुरु केल्याने तालुक्यातील वरळी मटका चालकांचे धाबे दणानले आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सवना येथे मागील दोन दिवसापुर्विच धाड टाकून दोघावर गुन्हे दाखल करुन दहा हजार आपसे चाळीस रुपयाचा मुद्देमाल केला होता. याच प्रकारे आज परत पोखरी येथील जुगार अड्ड्यावर धाड टाकून आरोपी नामे इंदल गोविंद राठोड वय 26 वर्ष बाबासाहेब नगर पोखरी हा आरोपी नामे गजानन तुकाराम राऊत वय वर्ष 30 राहणार पोखरी यांचे सांगण्यावरून वरळी मटका नावाचा जुगार चालवित होता पोलीस जमादार वसीम शेख आणि पोलीस शिपाई सुनील जाधव यांनी वरळी मटका जुगारावर धाड टाकून 560 रुपये नगद वरळी मटक्याच्या चिठ्ठ्या कार्बन पेन अशी साहित्य जप्त केली आहेत. या सततच्या धाडीमुळे तालुक्यातील वरळी मटका जुगार चालकात पोलिसांची वचक निर्माण झाली असून मटका चालकांचे धाबे दणानले असून अनेक ठिकाणचे मटका अड्डे पोलिसांच्या कार्यवाही मुळे बंद करण्यात आले आहे.