टाकळी येथे तळ्यातील तीन टन मांगुर मासा नष्ट : मस्यविभागाची कारवाई

करमाळा: तालुका प्रतिनिधी अलीम शेख
तालुक्यातील पश्चिम भागातील उजनी जलाशयाच्या परिसरातील टाकळी येथील तळ्यातील
तीन टन मांगुर मासा नष्ट करण्यात आला आहे. मस्यविभागाचे सहाय्यक आयुक्त पि.जी विरकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे . करमाळा तालुक्यातील पश्चिम भागात टाकळी येथे दोन तळ्यातील तब्बल तीन टन मांगुर मासा मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप वीरकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नष्ट केले आहेत. या परिसरात अजून अनेक प्रतिबंधित मांगुर मासा संवर्धन तलाव चालू असून या ठिकाणीही कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती पि.जी.विरकर यांनी पत्रकारांना दिली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की गोपनीय माहितीनुसार टाकळी परिसरात प्रतिबंधीत मांगुर मस्यपालन व मत्स्यसंवर्धन तलाव असल्याची माहिती मिळाली होती.
त्यामुळे मस्य संवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त पी.जी. वीरकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक मस्य विभागीय अधिकारी श्रीमती आर एस रावणगावे, व्ही.एस. वाघमोडे, एस.टी. घाडगे, एस. आर. मगदूम, के. एन. सौदाने, डि, बी. सरडे आदी अधिकारी व भीमा उपसा सिंचन विभागाचे कर्मचारी यांनी टाकळी भागात तलावांची तपासणी केली. यामध्ये ऋषिकेश करचे ,गोरख मोरे यांच्या तलावात मांगुर मास्यांचे संवर्धन होत असल्याचे आढळून आले. यावेळी या पथकाने या तलावाच्या शेजारीच खड्डा घेऊन तब्बल तीन टन मांगुर मासा गाडून नष्ट करण्यात आला.
यावेळी हवालदार मारुती रणदिवे, प्रशांत गायकवाड, पोलीस पाटील सोमनाथ कुचेकर आदी अधिकारी उपस्थित होते. मत्स्य विभाग सोलापूर, पाटबंधारे विभाग, तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आली. मांगुर मत्स्यपालन करणार्यावर कारवाई होत असतानाही उजनी जलाशयासाठी मोठ्या प्रमाणात मांगुर माशांचे बेकायदेशीर संवर्धन चालू आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन देणारा व्यवसाय असल्यामुळे मांगुर मासे संवर्धनाला प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र या मांगुर माशाला कोंबड्याची घाण, कुजलेलं, सडलेले कत्तलखान्यातील मांस, जनावरांचे मांस आदि खाद्य म्हणून मांगूर माशांना टाकण्यात येत असल्याने पर्यावरणाचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलेले सिद्ध झाले आहे .
याची गंभीर दखल राष्ट्रीय हरित लवादाने घेतलेली आहे. मानवी आरोग्याच्या दृष्टीने हे घातक असलेने मांगूर माशाच्या उत्पादनावर व विक्रीवर बंदी घातलेली आहे. त्यामुळे राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार मांगुर माशाची संवर्धनावर कायद्याने बंदी घातलेली असतानाही काही जण मांगुर माशांचे उत्पादन घेत आहेत. त्यामुळे ही कारवाई केली जात आहे. या माशांमध्ये झिंक, कॅडमियम, आरेसीनिक असे विषारी पदार्थाचे संक्रमण आढळून येत असल्याने व या मांगुर माशांमध्ये दूषित व हानिकारक बॅक्टेरिया असल्याने मानवाच्या आरोग्यावर याचा मोठा धोका जाणवत आहे. त्यामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढल्याचेही तज्ञांचे मत आहे. हा मांगुर मासा डबक्यात, चिखलात, गटारात, घाण पाण्यात वाढतो.
थाय नावाचा मांगुर मासा तर पाण्याशिवाय ही राहू शकतो. या सर्व बाबीचे राष्ट्रीय हरित लवादाने अभ्यास करून मांगुर माशाच्या उत्पादनावर व विक्रीवर बंदी घातलेली आहे. मांगुर मासा हा आरोग्यासाठी घातक आणि स्थानिक प्रजातीचे मासे नष्ट करणारा असतानाही मांगुर मासे पालनाची बेकायदा शेती उजनी पाणलोट क्षेत्रात अनेक ठिकाणी चालू आहे. अवघ्या तीन महिन्यांमध्ये याची मोठी वाढ होत असल्याने याकडे मत्स्य पालक आकर्षिले जात आहेत. मात्र मानवी आरोग्याच्या व पर्यावरणाच्या दृष्टीने ते हानिकारक असल्याने त्याला शासनाने बंदी घातली आहे.
उजनी जलाशयाकाठी बेकायदेशीर रित्या चालू असलेल्या मांगुर मत्स्य संवर्धन तलावावर कारवाई होत आहे.मानवाला तसेच पर्यावरणाला मांगुर माशामुळे धोका निर्माण झाला आहे .त्यामुळे मांगुर मांशाचे उत्पादन व विक्रीला बंदी घातली आहे. त्यामुळे मांगुर व्यवसाय करणार्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे.
..प्र.ग. वीरकर, सहाय्यक आयुक्त, मत्स्य विभाग
सोलापूर



