हीट ॲड रन काळा कायदा रद्द करण्यात यावा. हुकुमशाही बंद करावी.
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख
भारत सरकार 2024 भाजप सरकारने जो हिट ॲड रन ड्रायव्हर कडून जर अपघात झाला तर. 10 वर्षे तुरुंगवास 7 लाख रुपये दंडाची शिक्षा. कायदा लोकसभेत मांडून पास राज्य सभागृहात मांडून. भारत राष्ट्रपती यांच्याकडे पाठवून. कायदा करून जो देशातील मोल मजुरी. पिढ्यानपिढ्या दारिद्रय़ आपले कुटुंब जगविण्यासाठी घर दार सोडून ड्रायव्हिंग करतो.मंत्री महोदय ड्रायव्हर हा त्यांचा कुटुंबातील सर्व जबाबदारी पार पाडावी म्हणून रात्रंदिवस डोळ्यात तेल घालुन ड्रायव्हिंग करतो.शासनाने दिलेल्या नियम करून. मजुरी करून त्याला तुमच्या येव्हडा पगार सुद्धा नाही जेमतेम 15000 ते 20000 हजार रुपये महिना मिळतो.
ड्रायव्हर हा जाणून बुजून कधीच अपघात करत नाही. जेव्हढा जीव समोरच्याला असतो तेव्हढा त्याला पण असतोच. अपघात झाला तर तो जण समुदाय उपस्थित लोक मारहाण करून रागात काहीही करू शकतात. म्हणुन तो सुरक्षित ठिकाणी थांबतो. महोदय आपण कधी सामान्य जिवन जगलात का? जर जगला असता तर येव्हडा क्रूरपणे हिट ॲड रन्स सारखा कायदा केला नसता. तुम्ही हुकुमशाही पद्धतीने काम करताना दिसतात. ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या कडे कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे. त्याकडे दुर्लक्ष करून. देशातील गोर गरीब पीडित शोषितांच्या मुळावर घाव घालून तुम्ही काय सिद्ध करू इच्छित आहात. तरी मी आपणास सांगू इच्छितो की आपण केलेला हिट ॲड रन कायदा रद्द करावा. देशाच्या प्रगतीसाठी नवीन काहीतरी करावे. देशातील लोकशाही मार्गाने आपणास त्यांच्या हित जोपासण्यासाठी आपल्याला निवडून दिलेले आहे.
त्यांच्यावर अन्याय करण्यासाठी नाही. हा कायदा जेव्हढा इतर गुन्हा करण्या इतका डेंजर नाही तेव्हढा हिट ॲड रन कायदा आहे. यामुळे भविष्यात ड्रायव्हर होण्यासाठी कोणीही तयार होणार नाहीत. देशावर उपासमारीची वेळ येईल. आपण हा कायदा रद्द करावा. अन्यथा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने चक्का जाम आंदोलन केले जाईल. असा इशारा निवेदनात देण्यात आला. निवेदन करमाळा तहसीलदार नायब. जाधव साहेब यांनी स्विकारले. यावेळी युवा शहर अध्यक्ष. गणेश कांबळे, ता.संघटक, महावीर पोळ. उपाध्यक्ष. गणेश आहेर,उपाध्यक्ष. साधू चौथमहाल,राहुल कांबळे, कालिदास पवार, निलेश कांबळे, अभिमान कांबळे, बाळासाहेब कांबळे, शिवा पवार भारिप चे. प्रविण ओहोळ पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.