महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640.
महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या पोलिस महासंचालक बनणाऱ्या त्या 1988 या बॅचच्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. रविवार दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ सेवानिवृत्त झाल्या नंतर या पदावर रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीचे आदेश राज्य शासनाने गुरुवार दिनांक 04 जानेवारी 2024 रोजी जारी केले आहेत. त्यांचा या पदावरचा कालावधी जून 2024 रोजी संपुष्टात येणार असून त्या जून 2024 रोजी सेवानिवृत्त होणार आहेत.
रश्मी शुक्ला 1996 ते 1999 या कालावधीमध्ये नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या. यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2018 मध्ये रश्मी शुक्ला यांची राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त पदावर नेमणूक करण्यात असताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख, शिवसेना खासदार संजय राऊत, काँग्रेस प्रदेशअध्यक्ष नाना पाटोळे, आणि भाजपचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी त्या चर्चेत आल्या होत्या यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता व या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाल्यानंतर रश्मी शुक्ला यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. आणि आता गुरुवार दिनांक 4 जानेवारी 2024 पासून पासून त्यांची नियुक्ती राज्याच्या महासंचालक पोलीस पदावर करण्यात आली आहे.