पालघर लोकसभा खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते वसई येथे भूमिपूजनाचा सोहळा संपन्न
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक ५ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता वसई सांडोर येथील स्मशानभूमी तसेच आडणे येथे दुपारी २ वाजता सभागृहाच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला यावेळी आडणे, आक्टण, लोहारआळी, खराळे येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वसई विरार शहर पालिकेच्या माध्यमातून वसईच्या सांडोर येथील स्मशानभूमीवर तोडक कारवाई करण्यात आली होती. यानंतर ही स्मशानभूमी वादाच्या भोवऱ्यात आणि विकासाच्या प्रतीक्षेत होती. मात्र पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांच्याकडे तेथील स्थानिक नागरिकांनी स्मशानभूमी बांधून देण्यात यावी अशी मागणी केली होती. सदर नागरिकांच्या मागणीची दखल खासदार यांनी त्वरित घेऊन शुक्रवार दिनांक ५ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता या स्मशानभूमीचे भूमिपूजन केले.
तसेच वसई तालुक्यातील आडणे गावासाठी भव्यदिव्य सभागृहाची उभारणी केली जाणार आहे. या सभागृहाच्या उद्घाटनाचा समारंभ शुक्रवारी खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते दुपारी २ वाजता संपन्न झाला. सांडोर येतील स्मशानभूमीला १० लाखाचा आणि आडने येथील सभगृहाला १० लाखाचा निधी देण्यात आला असल्याचे खासदार यांनी बोलताना सांगितले. यावेळी सरपंच वैशाली नानकर, शिवसेना शिंदे गटाचे नेते नवीन दुबे, पालघर जिल्हा अध्यक्ष निलेश तेंडोलकर तसेच डॉम्निका डाबरे, आणि भारतीय जनता पक्षाचे शाम पाटकर, ममता पाटील, राजू पाटील, अजय म्हात्रे, तसेच आक्टण, लोहारआळी, खराळे येथील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी स्थानिक नागरिकांनी खासदारांचे आभार व्यक्त केले.