पाटील गटाकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू, सोशल मीडिया वॉर रूम स्थापन
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
पाटील गटाकडून विधानसभा निवडणुकीची रणनीती आखली जात असून काही गुप्त बैठका सुरू झाल्याची माहिती आता समोर आली आहे. सन २०२४ च्या अगदी पहिल्या आठवड्यातच माजी आमदार नारायण पाटील गटाकडून काही खास नियोजन पाटील गटाच्या थिंक टँक द्वारे केले गेले आहे. याचाच एक भाग म्हणून सोशल मीडिया वॉर रूम तयार करून त्याचे नेटवर्क संपूर्ण करमाळा विधानसभा मतदार संघात पसरविण्यासाठी चाळीस युवा कार्यकर्त्यांची एक टीम तयार करण्यात आल्याचे समजते.
“एन.पी. मिशन २०२४” या नावाने आता सोशल मीडियाच्या या नेटवर्कचा उपयोग केला जाणार आहे. यातून वृत्तपत्रातील व न्युज पोर्टल वरील बातम्या, सन २०१४ ते २०१९ मध्ये तत्कालीन आमदार नारायण पाटील यांनी केलेली विकासकामे, मतदार संघातील सध्याचे ज्वलंत प्रश्न आदी सर्व माहिती अगदी शेवटच्या नागरिका पर्यंत पोहविन्याचे टारगेट या वॉरियर्सना दिले गेले आहे. विधानसभा निवडणुकी पूर्वी लोकसभा निवडणूक होणार असली तरी पाटील गटाने माजी आमदार नारायण पाटील यांना सन २०२४ मध्ये आमदार करण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू केल्याचे समजते. पश्चिम भागातील पाटील गटाचे कट्टर कार्यकर्ते तथा फेसबुक किंग संजय फडतरे (पोमलवाडी) यांच्यावर सोशल मीडिया तालुका प्रमुखाची जबादारी देण्यात आल्याचे समजते.
तसेच या टीम मध्ये विशाल ताकिक, दिग्विजय अंबारे-पाटील, बाबासाहेब कोपणर यांचे सह पृथ्वीराज पाटील ग्रुप मधील अनेक तरुणांचा समावेश आहे. तसेच पांगरे येथील संतोषबापू पाटील यांच्या सारख्या अगदी १९९० पासून पाटील गटात कार्यरत असलेल्या अनुभवी कार्यकर्त्यावर सुद्धा जबाबदारी टाकण्यात आल्याचे समजते. पाटील गटाचे युवानेते सरपंच पृथ्वीराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही नियोजन बैठक पार पडली असून यात पाटील गटाचे मार्गदर्शक प्रा अर्जुनराव सरक आणि सुनील तळेकर यांनी मार्गदर्शन केल्याची माहिती मिळाली आहे.