सामाजिक

विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते….वसई विरारसाठी केंद्राकडून 1 हजार कोटींची निधी मंजुरीसाठी खासदार राजेंद्र गावित यांना यश

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा

प्रतिनिधी विजय घरत.

भ्रमणध्वनी क्रमांक-7030516640

देशातील प्रत्येक नागरिकांच्या हितासाठी पंत्रपधान नरेंद्र मोदी हे प्रयत्नशील असून त्यांनी केंंद्र शासनामार्फत 17 विविध योजना आणल्या आहेत. विकसित भारत संकल्प यात्रेत्या माध्यामातून या योजनेचा लाभ नागरिकांच्या दारात मिळणार आहे. त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांनी केले आहे . बुधवारी नायगाव येथे विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते झाला. यावेळी गावित यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून वसई विरारकरांसाठी आणलेल्या विविध योजनांची माहिती दिली. वसई विरारसाठी 1 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणल्याचेही गावित यांनी सांगितले.

केंद्र शासनाच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी आणलेल्या विविध योजनांचा अत्यंत कल्याणकारी असून त्यामुळे नागरिकांना मोठा लाभ मिळणार आहे. पालिकेने अत्यंत कमी वेळेत चांगले नियोजन करून या यात्रेची सुरुवत केली आहे.असे गौरवोद्गार खासदार राजेंद्र गावित यांनी केले. केंद्र शासनाच्या विकसित भारत संकल्प यात्रेचा भव्य शुभारंभ बुधवारी नायगाव येथील परेरा नगरमध्ये झाला. यावेळी खासदार राजेंद्र गावित आणि पालिका आयुक्त अनिलकुमार पवार उपस्थित होते. केंद्र शासनाकडून नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यामध्ये प्रधानमंत्री पथविक्रेता, आत्मनिर्भर निधी, प्रधानममंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री ई-बस योजना, अमृत योजना आदी 17 विविध योजनांचा समावेश आहे. या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवून त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ या मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार 28 नोव्हेंबर 2023 रोजी नायगाव येथे यात्रेचा शुभारंभ खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते झाला. या मोहिमेअंतर्गत शासकीय योजनांची माहिती देणारी व्हॅन 28 नोव्हेंबर ते 22 डिसेंबर 2023 या कालावधीत वसई विरार शहरात एकूण 49 ठिकाणी ही यात्रेंअतर्गत व्हॅन फिरणार आहे.यावेळी खासदार गावित यांनी या यात्रेची संकल्पना सांगितली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील एकही नागरिक उपाशी पोटी झोपू नये,कुपोषणाने कोणी दगावू नये यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून 17 उपक्रमांद्वारे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. असे ते म्हणाले. या यात्रेत लाभार्थी म्हणून पात्र

असलेल्या व्यक्तींची नोंदणी केली जाणार आहे. असुरक्षित आदिवासी गटासाठी डेव्हलपमेंट मिशन कार्यक्रम लागू करण्यात आला आहे. असे ते म्हणाले. आता पर्यंत लाखो लोकांना शासन आपल्या दारीचा उपक्रमाचा फायदा मिळाल्याचेही खासदार गावित म्हणाले.वसई विरार शहराला सुर्या प्रकल्पातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पाणी दिल्याचे ते म्हणाले. जनतेची निकड ओळखून उद्घाटन न करता पाणी पुरवठा सुरू केल्याचे खासदार म्हणाले. केंद्राकडे पाठपुरावा करून घनकचरा प्रकल्प, सांडपाणी प्रकल्प आदींसाठी 1 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणल्याचे ते म्हणाले. वसईत 200 खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय तयार केले जाणार आहे. जागेचा तिढा आयुक्तांनी सोडवून पुर्तता करावे असे खासदार गावित म्हणाले. या कार्यक्रमास वसई विरार शहर महानगपालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार, हास्य जत्रा फेम कलाकार अभिनेते अरुण कदम, प्रांत अधिकारी शेखर घाडगे, तहसीलदार कोष्ठी, भाजपचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील तसेच महानगर पालिकेचे अधिकारी, कर्मचारी वर्ग, शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button