मुस्लिम समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदी पीरसाहेब जमादार यांची निवड तर सांगोला तालुका अध्यक्षपदी मोहसीन मुलाणी व सांगोला शहर उपाध्यक्ष पदी हाजी महंमदगौस नाडेवाले यांची निवड!

विषेश प्रतिनिधी रोहित ओव्हाळ टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो.नं. :- 88 30 47 83 36
पंढरपूर : मुस्लिम समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून सर्व समाजातील युवाशक्ती संघटन करून त्यांचे प्रश्न सातत्याने सोडवून सर्व समाजास सहकार्य करत असते अशाच सर्व समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता मुस्लिम समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदी पीरसाहेब बशीर जमादार यांची निवड मुस्लिम समन्वय समितीचे प्रदेशाध्यक्ष रशीद भाई शेख यांनी केली.

तसेच मुस्लिम समन्वय समिती प्रदेशाध्यक्ष रशिद भाई शेख यांच्या अध्यक्षतेखाली व सांगोला तालुका अध्यक्ष इम्रानखान मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समन्वय समितीच्या सांगोला शहर अध्यक्षपदी मोहसीन मुलाणी व सांगोला शहर उपाध्यक्ष पदी हाजी महंमदगौस नाडेवाले यांची निवड करण्यात आली

मुस्लिम समन्वय समितीच्या माध्यमातून सर्व समाजिक शक्ती संघटित करून त्यांचे प्रश्न सातत्याने सोडवून सर्व समाजास सहकार्य व सर्वांगीण विकासाकरिता प्रयत्नशील राहल अशी अपेक्षा मुस्लिम समन्वय समितीचे प्रदेशाध्यक्ष रशीद भाई शेख यांनी व्यक्त करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

त्यांच्या या निवडीने पंढरपूर तालुक्यासह सांगोला तालुक्यातील मुस्लिम समाजातील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यांच्या पुढील कार्यास टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क च्या खुप खुप शुभेच्छा