Uncategorizedशहर

माळीनगर येथे तुकोबांच्या पालखी सोहळ्यात नव भारत साक्षरता अभियान कार्यक्रमनिमित्त काढण्यात आलेली रांगोळी पाहताना शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर

प्रतिनिधी… रियाज मुलाणी
मो 9921500780

नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत योजना शिक्षण संचालनालय आयोजित वारी साक्षरतेची या अनुषंगाने राज्यभर विविध उपक्रम सुरू आहेत माळीनगर येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर व शिक्षण अधिकारी सुलभा वठारे,यांच्या उपस्थितीत साक्षरतेचा जागर करण्यात आला

यावेळी मॉडेल वविधांगी प्रशाला याच्या वतीने बाळासाहेब सोनवणे, राजेश कांबळे, संजय बांदल, यांच्या मार्गदर्शनाखाली साक्षरता दिंडी काढण्यात आली, राज्य योजन शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर व योजना शिक्षण अधिकारी सुलभा वठारे व साक्षरता रथातील सदस्यांचे स्वागत प्राचार्य कलाप्पा बिराजदार, उपप्राचार्य रितेश पांढरे, पर्यवेक्षक कल्याण कापरे, यांनी केले

यावेळी प्रशांत सरवदे यांनी साक्षरता गीत सादर केले प्रशालेच्या मैदानावर शिक्षिका रजनी चौरे, किशोरी चवरे, मनीषा नलवडे, मेघा जोशी, आशा रानमाळ, रणजीत लोहार, व विद्यार्थिनी यांनी साक्षरता वारीची काढलेली मोठी रांगोळी सर्वांची लक्ष वेधून घेत होती.

याप्रसंगी केंद्रप्रमुख राजेश जाधव, पत्रकार मिलिंद गिरमे, हरिदास शिंदे, करीम कोरबू, विनोद करडे, रामहरी वायचळ, पंजाबराव शिरसाट, नाना भोंग, सचिन दळवी, भीमराव चंदनशिवे, दगडू वाघमारे, शितल बिराजदार, संभाजी कांबळे, विलास शिंदे, विजय हेगडे, अण्णासाहेब शिंदे, सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button