महाराष्ट्र

माळीनगर येथे कृषीदुतांच्यावतीने ग्रामीण जागरूकता कार्यक्रमाचे उद्घाटन

माळीनगर —-प्रतिनिधी रियाज मुलाणी मो.99 21 500 780

माळीनगर ता. माळशिरस येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, अंतर्गत अकलूजच्या रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी ग्रामीण जागरुकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष- संग्रामसिंह मोहिते पाटील ,रत्नाई कृषी महाविद्यालयाचे समन्वयक तसेच प्राचार्य- आर जी नलावडे, प्राध्यापक- एस एम एकतपुरे, प्राध्यापक- एस आडत, प्राध्यापक- डी एस मेटकरी -यांच्या मार्गदर्शनानुसार हा कार्यक्रम आयोजित केला होता याप्रसंगी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक- विराज निंबाळकर कृषीआधिकारी रोहित जावळे ,कृषी सहाय्यक सारिका एकतपूरे ,विस्तार अधिकारी अशोक डोके, ग्रामसेवक-मोहन शिंदे माजी सरपंच गणेश जगताप , समाजसेवक अनिल लोंढे,आदि मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे महाराष्ट्र शासन कृषी विभागातील इतर योजना तसेच उसावरील हुमणी नियंत्रण, मक्यावरील लष्करी आळी, शेती शाळा, ऊस पाचट व्यवस्थापन, Mahadbt मध्ये ट्रॅक्टर,, अवजारे व इतर सर्व यंत्रे( मळणी मशीन ,फवारणी यंत्र, पावर टिलर, रोटावेटर) फळबाग लागवड, ड्रॅगन फ्रुट लागवड, कांदा चाळ, प्रधानमंत्री अन्य प्रक्रिया उद्योग(PMFME) ठिबक सिंचन, तुषार सिंचन, मागेल त्याला शेततळे, शेततळे अस्तरीकरण, पॕक हाऊस ,2 लाख अनुदान, शेडनेट प्लास्टिक मल्चिंग, अशा विविध शासकीय योजना या विषयावर कृषी सहाय्यक सरिका एकतपुरे यांनी विस्तृतपणे मार्गदर्शन केले

या प्रसंगी भाग्यश्री कदम, आकांक्षा मोरे ,लक्ष्मी कोरे ,रोहिणी गोलेकर, मेघना मोरे, श्वेता भडंगे ,अंकिता भोगावडे, प्रणाली देशमुख, प्रशाली पवार ,आदि कृषीदूत उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button