महाराष्ट्र
पिंपरी बुद्रुक येथे गायरान गटात अतिक्रमण करत जिल्हा बँकेचे एटीएम सेंटरची उभारणी, कारवाईची अश्वजित कांबळे यांची मागणी

कार्यकारी—— उपसंपादक
हुसेन ——-मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
मो.—– 97 30 867 448
- पिंपरी बुद्रुक येथील गायरान गटात अतिक्रमण करून पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एटीएम सेंटर चालू केले आहे. सदरची सखोल चौकशी करून सदर व्यक्ती, तलाटी व मंडलाधिकारी यांच्यावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते अश्वजित कांबळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
पिंपरी बुद्रुक येथील गायरान गट नंबर १/१ मध्ये पांडूरंग व प्रकाश हंबीरराव बोडके यांनी अतिक्रमण करून पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एटीएम सेंटर चालू केले आहे. सदरचे अतिक्रमण नियमानुसार नसून जमिन महसूल १९६६ चे कलमानुसार सदरचे एटीएम बेकायदेशीर असल्याची साशंकता आहे. सदर व्यक्तींनी एटीएम सेंटरचे बांधकाम कोणत्या अधिकारात केले आहे. तसेच त्यांनी बॅकेला केलेल्या ॲग्रीमेंट, करार व इतर नाहरकती बाबत सखोल चौकशी करून संबंधित इसम, तलाटी, मंडलाधिकारी यांच्यावर तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनात शेवटी अश्वजित कांबळे यांनी केली आहे.
सदर बाबत संबंधित व्यक्तींना नोटीसा काढण्यात आले आहेत. सदर निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, महसूल मंत्री, विभागीय आयुक्त, पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक आदिंना देण्यात आले आहेत.





