माळशिरस तालुक्यात नव्याने मंजूर होणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांची चौकशीची मागणी

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
माळशिरस तालुक्यात नवीन 21 स्वस्त धान्य दुकानांचे प्रसिद्धीकरण झाले आहे त्या अनुषंगाने माळशिरस तहसील मध्ये प्रत्येक गावामधून महिला बचत गट व सामाजिक संस्था यांनी अर्ज दाखल केले आहे त्यामध्ये अनेक संस्था मधील सदस्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्यांची चौकशी करून त्या संस्थेचा अथवा बचत गटांचा ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांचा अर्ज ना मंजूर करण्यात यावा व ज्यांनी खोटे प्रतिज्ञापत्र दिले आहेत

त्यांच्यावर कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे सरचिटणीस साजिद भाई सय्यद यांनी माळशिरसचे तहसीलदार यांच्याकडे केली असून माहितीस्तव या प्रति राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ पुणे उपायुक्त पुरवठा विभाग पुणे विधानभवन तसेच सोलापूर जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाताई लांडगे यांना देण्यात आले आहे




