जागतिक आदिवासी दिनानिमित्त राजीव गांधी मैदानावर राज्यस्तरिय कार्यक्रम संपन्न.

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत
जव्हार तालुक्यातील राजीव गांधी मैदान येथे जागतिक आदिवासी दिना निमित्त आदिवासी विकास विभागामार्फत राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आयोजित केलेल्या कार्यक्रम मंचावर महाराष्ट्रातील अनेक जिल्हातील युवा-यीवतींनी नृत्य सादर करण्यात आले यात तारपा नृत्य,सांबळ नाच,तुर नाच,ढोल नाच,असे नृत्य सादर केले.आदिवासी युवकांनी वेगवेगळ्या नृत्याची वेश भुषा परिधान करुन नृत्य सादर केली,
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री,एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. तर, आदिवासी विकास मंत्री डाॅ विजय कुमार गावित,श्रीमती कुमुद गावित, सार्वजनिक बांधकाम (सार्वंजनिक उपक्रम वगळून)मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, खा. राजेंद्र गावित, आ.शांताराम मोरे, आ.श्रीनिवास वनगा, आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप कुमार व्यास, माजी आमदार रवींद्र फाटक, आदिवासी विकास आयुक्त श्रीमती नैना गुंडे, राज्यस्तरीयआढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडीत, पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके, अपर आयुक्त आदिवासी विकास बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, डहाणू प्रकल्प अधिकारी संजीता महापात्रा, जव्हार प्रकल्प अधिकारी नेहा भोसले, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब फटांगरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थीत होते.



