अकलूज येथे सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभागात ऑगस्ट क्रांतीदिन साजरा

कार्यकारी –उपसंपादक
हुसेन —मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो.—–9730 867 448
अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभाग मध्ये ऑगस्ट क्रांती दिन साजरा करण्यात आला
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका शेख मॅडम उपस्थित होत्या. प्रारंभी सर्व शिक्षकांच्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मगर मॅडम यांनी केले.

त्यानंतर प्रशालेतील विद्यार्थी पृथ्वीराज कांबळे,अंतरा कदम,अझीन फकीर,सिनिन शेख,दत्तराज बारबोले या बालचमुंनी आपले विचार मांडले.तसेच प्रशालेतील सहशिक्षक .सोमनाथ बाजारे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

तसेच “आज मेरी मिट्टी मेरा देश “मोहिमे अंतर्गत प्रतिज्ञा घेण्यात आली.यावेळी प्रशालेतील सर्व विद्यार्थी,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रतिज्ञा घेतली. याप्रसंगी विद्यार्थी,शिक्षक उपस्थित पालक वर्ग संख्येने उपस्थितहोते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन.मगर मॅडम यांनी केले.



