महाराष्ट्र

अकलूज नगर परिषदेच्या पाणीपुरवठा करणारा व्हाॕल्व मुळे आपघाताची शक्यता

कार्यकारी —उपसंपादक हुसेन—- मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो.—– 97 30 867 448

अकलूज येथील उपजिल्हा समोर एक बोळ असून त्या बोळातील रस्त्यावरून नागरिक शिवापुर पेठेत जात असतात मात्र त्याच रस्त्यावर पाणीपुरवठा करणारे नगर परिषदेचे व्हाॕल्व रस्त्यावरच असून तो मोठ्या खड्ड्यात आहे शिवाय तो रस्त्यावर असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे अथवा दुचाकी धारकांचे दुर्लक्ष झाल्यास ते खड्ड्यात पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही याच अनुषंगाने मागील सहा महिन्यापूर्वी “टाइम्स 9 मराठी न्यूज “ने त्या संदर्भात न्युज प्रसिध्द केली होती

त्यानंतर व्हाॕल्ववर स्लॅप टाकून झाकले होते मात्र सहा महिन्यातच हा स्लॅब पूर्णपणे कोसळला असुन परत रस्त्यावरच खड्डा झाला आहे जर 6 महिन्यातच स्लॅब कोसळत असेल तर हे काम उत्कृष्ट दर्जाचे आहे की निकृष्ट दर्जाचे आहे हेच न उलगडणारे कोडे आहे तरी नगरपरिषदेने याची पाहणी करून तातडीने व्हाॕल्व चा खड्ड्यावर स्लॅप टाकून दुरुस्त करावा व नागरिकांनी दुचाकी धारकांचे होणारे अपघात टाळावे अशी मागणी या परिसरातील व्यापारी वर्गातुन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button