महाराष्ट्र

माळीनगर ग्रामपंचायतच्या नूतन कार्यालयाचे बांधकाम नित्कृष्ट दर्जाचे असल्याने ठेकेदारास बील अदा न करण्याची मागणी

माळीनगर —– प्रतिनिधी
रियाज –मुलाणी
[मो.—9921 500 780

माळीनगर ग्रामपंचायत नुतन कार्यालयाचे बांधकाम (८२लाख रु.चे) सुरू असून सदरचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असुन सदर कार्यालयाचे काम शासकीय इस्टिमेट नुसार स्टील, खडी, डस्ट, सिमेंट इत्यादी मटेरियल . योग्य प्रमाणात न वापरल्याने सदर कार्यालयाचे काम एकदम नित्कृष्ट दर्जाचे झाले असुन स्लॅब गळत आहे. सदर स्लॅबला काही ठिकाणी होल असून त्यात माती आढळून येत आहे तसेच सदरच्या स्लॅबला भेगा पडलेल्या आहेत. सदर बांधकामाकरिता लागणारे मटेरियल (वीट, सिमेंट इ.) हे कमी प्रतीचे आणि कमी दर्जाचे वापरले असल्यामुळे सदरचे काम निकृष्ट दर्जाचे आहे तरी सदरच्या कामाची चौकशी व तपासणी व्हावी, कारण भविष्यात नित्कृष्ट कामामुळे मनुष्यहानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही

तसेच माळीनगर ग्रामपंचायत चे कोणतेही काम गेली १० वर्ष एकाच ठेकेदारास दिल्याचे दिसून येत आहे. तरी संबंधित ठेकेदारा विरुद्ध यापूर्वी ग्रामपंचायत, BDO CEO यांच्याकडे तक्रार करूनही संबंधित टेकेदारवर कोणतीही कारवाई केली गेली नाही. त्यामुळे सरपंच, ग्रामसेवक, ठेकेदार व तपासणी अधिकारी यांचे एकमेकाशी संगनमात व लागेबांधे असल्याने कार्यवाही होत नाही असे दिसुन येत आहे . तरी कृपया वरील कामाची चौकशी होऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई व्हावी. तसे न झाल्यास पुढील १५ दिवसात आम्ही लोकशाही मार्गाने कोणतीही पूर्व कल्पना न देता आंदोलन करण्यात येईल. त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील. तरी आम्हा नागरिकास योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी माळीनगर ग्रामपंचायत चे ग्रामसेवक तथा प्रशासका कडे
निवेदनाद्वारे केली असुन या निवेदनावर अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button