महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणतेही गट तट नसल्याच्या शरद पवार यांच्या दाव्यामुळे विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या.

माळीनगर… प्रतिनिधी – रियाज मुलाणी, टाइम्स 9 मराठी न्यूज मो .9921500780

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने नुकतेच निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवले होते. त्यात राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी अजित पवार यांची निवड करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता .या पत्रावर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला पत्र पाठवून आपली बाजू स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार पवारांनी पाठवलेल्या आपल्या उत्तरात आपल्या पक्षात कोणतेही गट तट नसल्याचा दावा केला आहे.

शरद पवार गटाने आयोगाकडे म्हटले आहे की अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर दावा ठोकणे अकाली व दुर्दैवी आहे ही मागणी आयोगाने फेटाळी पाहिजे अजित पवार यांच्या याचिकेत राष्ट्रवादीत 2 गट पडल्याचे कोणतेही पुरावे नाही प्रथम दर्शनी निवडणूक आयोगाने ही अजित पवार यांच्या गटात वाद असल्याचे सिद्ध केले नाही.

एवढेच नाही तर 1 जुलै 2023 पूर्वी अजित पवार यांनी शरद पवार अथवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविरोधात कोणतीही तक्रार केली नव्हती ही बाब शरद पवार यांच्या गटाने निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिली आहे. अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट पडले आहेत हे सर्वश्रुत आहे पण पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मात्र आपल्या पक्षात कोणताही गट तट अन वाद नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button