महाराष्ट्र

लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती परीसरात शालेय साहित्य वाटप करून साजरी करण्यात आली.

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी,
मोबाईल – 8378076123

साहीत्यरत्न लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त परीसरात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त चैतन्य विद्यालय नरसिंहपूर, शिवपार्वती इंग्लिश स्कूल नरसिंहपूर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टणू, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणवस्ती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आडोबावस्ती येथील गरजू शालेय विद्यार्थ्यांना मोफत वही, पेन, शैक्षणिक साहीत्य वाटप करण्यात आले.

बहुजन ब्रिगेड महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संदिप मोहीते, टणु ग्रामपंचायतचे सरपंच प्रतिनिधी तेजस मोहिते यांच्या हस्ते वाटप करून अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने बोलताना संदिप मोहिते म्हणाले, एक पाऊल शिक्षणासाठी आपणही हातभार लावणे गरजेचे आहे. समाजातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्यासारख्या व्यक्तींनी सढळ हाताने मदत करावी.

सरपंच प्रतिनिधी तेजस मोहिते म्हणाले, शिक्षणासाठी लागणारी मदत ही दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने द्यावे त्यास आम्हीही कमी पडणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button