महाराष्ट्र

एक वेळ वंचीत बहुजन आघाडीला देशातील तमाम मागासवर्ग व बहुजन समाजाने सत्ता द्यावी

माळीनगर –प्रतिनिधी – रियाज मुलाणी टाइम्स 9 मराठी मो.9921500780

महाराष्ट्रात देशात परिवर्तन घडवून आणल्या शिवाय खरे अर्थाने मागास घटकांना न्याय मिळणार नाही देशात धर्म जात पंथ या नावाने राजकारण करुन लोकशाही धोक्यात आणण्याचे काम धर्माच्या नावाखाली सत्ता उपभोगणारे करत आहेत स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षांनंतर ही प्रस्थापित नेते घराणेशाहीचा डांगोरा पिटत तेच तेच सत्तेच्या राजकारणात आपले बुड घट्ट धरून बसले आहेत अँड प्रकाश आंबेडकर यांचे स्वप्न आहे

आजपर्यंत सत्तेपासून बारोकोस लांब राहिलेल्या उपेक्षित वंचित दुर्लक्षित अल्पसंख्याक घटकांचे लोकांना न्याय मिळाला पाहिजे वैदू डोंबारी कैकाडी फासेपारधी गाय पारधी टकारी साळी माळी कोळी रामोशी भिल्ल समाजाचे लोकांना सत्तेत सहभागी होता आले पाहिजे या घटकांचा सत्तेत सहभाग कधी होणार त्यांच्या न्यायासाठी हक्कासाठी सत्तेतील सहभागासाठी वंचित बहुजन आघाडीला राज्यात देशात सत्ता देण्यासाठी एक वेळ अँड प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्वाखाली काम करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला सत्ता द्यावी

एकट्या प्रकाश आंबेडकर यांना सत्ता नकोय तर बहुजन घटकांचा सत्तेत शिरकाव करण्यासाठी त्यांची आरपारची लढाई आहे त्यांना मंत्रिपद मिळवण्यासाठी काहीही शक्य नाही ते दुसर्याच्या वळचणीला जाऊन त्यांना सत्तेचा तुकडा नकोय तर या राज्यातील देशातील उपेक्षित वंचित दुर्लक्षित अल्पसंख्याक घटकांचे लोकांनी मनात आणलं तर परिवर्तन सहज होऊ शकते दुसरा मुद्दा असा की जर या घटकांनी मनोमन ठरवलं तर धर्म जात पंथ या नावाने जातीचे धर्माचे राजकारण करुन सत्तेला विळखा घालून बसलेल्या लोकांना मतदान न करता त्यांना घरी बसवता येते वंचित बहुजन आघाडी मुळे गत पंचवार्षिक लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात बारा मातब्बर नेत्यांना घरी बसावं लागलं आहे

विधानसभा निवडणुकीत अनेक रथी महारथी यांची दमछाक होऊन त्यांना फटका बसला आहे कोणाला सत्तेपासून रोखायचे ही ताकद वंचित बहुजन आघाडी मध्ये अँड प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्वाने दाखवून दिले आहे याची कबुली व धसका वारंवार विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे जाहीर भाषणात दिली आहे या वेळी लोकसभा विधानसभा निवडणुकीत परिवर्तन घडवून आणल्या शिवाय मागास घटकांना न्याय मिळणार नाही हे त्रिवार सत्य आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button