महाराष्ट्र

महात्मा गांधी ,महात्मा फुले, व पंडित जवाहरलाल नेहरू, साईबाबा, यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करुन अटक करावी–माळशिरस तालुका काँग्रेस ची मागणी

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. —– 97 30 867 448

राष्ट्रपिता महात्मा गांधी,क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी माळशिरस तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे.

गेली काही दिवसांपासून संभाजी भिडे हे देशातील राष्ट्रपुरूषा बद्दल तसेच राष्ट्रध्वजा बद्दल आक्षेपार्ह विधाने केली आहेत.परंतु शासन त्यांचेवर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही.

काल भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे मुख्य प्रवर्तक राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अवमानकारक वक्तव्ये केले आहेत. तसेच क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे बद्दल ही अत्यंत घाणेरडे शब्द वापरले आहेत.सर्वधर्माचे प्रतिक असलेल्या राष्ट्रसंत शिर्डीचे साईबाबा यांचे बद्दल ही आक्षेपार्ह केली आहेत शासन त्यांचेवर कोणतीही कारवाई नसल्याने वारंवार करत आहेत.

हा प्रकार अत्यंत निंदनीय असून, महान राष्ट्र पुरुषांचे महत्त्व कमी करण्यासाठी चाललेली ही केवीलवाणी धडपड आहे. सर्वधर्मसमभाव ही आपल्या देशाची ओळख असून ती पुसण्यासाठीहि हा प्रयत्न करीत आहेत. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे हे वादग्रस्त आणि हीन दर्जाचे बेताल वक्तव्य अनेकदा करत असतात . त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणाऱ्या महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. तसेच क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबतही अवमानकारक वक्तव्य करून राज्यात जातीय दंगली घडवून आणण्याचे हे षड्‌यंत्र आहे.तसेच करोडो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीचे श्री.साईबाबा यांचे बद्दलही आक्षेपार्ह विधान केल्याने अनेक लोकाचे मन दुखावले आहे.

सबब आपणास विनंती की, राष्ट्रपिता महात्मा गांधी, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू,राष्ट्रसंत शिर्डीचे श्री.साईबाबा यांचे बाबत आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्य हे राज्यात जातीय तेढ निर्माण करून दंगली पेटवायच्या उद्देशाने केलेले आहेत.तरी याबाबत संभाजी भिडे यांचेवर ताबडतोब कारवाई करून त्यांना अटक करावी. अशी मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे

याप्रसंगी माळशिरस तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सतीश नाना पालकर अकलूज शहर अध्यक्ष नवनाथ साठे जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब इनामदार जिल्हा अध्यक्ष जनसेवा संघटना शिवाजीभाऊ इंगवले देशमुख माळशिरस तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्ष मयूर माने आकाश साठे श्रीमंत लांडगे विकास शिंदे सचिन पाटील विजय खंडागळे विशाल अडसूळ महादेव भोसले सोमनाथ परदेशी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button