महाराष्ट्र

अकलुज मुस्लिम समाज दफनभूमीमधील समस्यांचे निवारण करावे –अन्यथा तीव्र आंदोलन –सोलापूर जिल्हा काँग्रेस चा इशारा

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . ——-97 30 867 448

संपूर्ण आशिया खंडात अग्रेसर असलेल्या अकलूज ग्रामपंचायतचे नगरपरिषद मध्ये रूपांतर झालेल्या नगरपरिषद हद्दीत मुस्लिम समाज बांधवांच्या पवित्र असलेल्या दफनभूमीमध्ये जनावरांचा सुळसुळाट होत आहे तसेच त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची स्वच्छता नाही व सदर कब्रस्तानच्या कंपाऊंडची भिंती देखील पडलेल्या आहेत. सदरच्या संरक्षण भिंती ह्या पडलेल्या असल्यामुळे जनावरे त्या ठिकाणी धुमाकुळ घालत आहेत.

त्यामुळे समस्त अकलुज शहर मुस्लिम समाजामध्ये तीव्र असंतोष व चीड निर्माण होत आहे व समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत. यापुर्वी देखील आपल्या नगरपरिषदेला वारंवार तक्रारी करुन देखील त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. तरी सदर दफनभूमीमध्ये होत असलेला जनावरांचा धुमाकुळ , अस्वच्छता , दफनभूमीच्या जागेत झालेले अतिक्रमण , संरक्षण भित नादुरुस्ती इत्यादी समस्या वर लवकरात लवकर आपले स्तरावरून कार्यवाही करावी अन्यथा याबाबत कार्यवाही न झाल्यास समस्त अकलुज शहर मुस्लिम बांधवांच्या वतीने व सोलापूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल

असा इशारा सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा सचिव फिरोज देशमुख यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे तसेच यासंदर्भात सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी दफन भूमीच्या समस्या लवकरात लवकर दूर कराव्यात असा आदेश अकलूज नगर परिषदेचे मुख्य अधिकारी दयानंद गोरे यांनाही भ्रमणध्वनी वरून दिला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button