महाराष्ट्र

महाराष्ट्रात तत्वाचे राजकारण राहिलेलं नाही – महेश शिंदे

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडलेली आहेत.यावर मैत्री प्रतिष्ठान सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे यांनी आपली भूमिका व्यक्त करताना म्हणाले की महाराष्ट्र सध्या तत्वाचे राजकारण राहिलेलं नाही आणि कोणत्याच राजकीय पक्षावर विश्वास ठेवणे अवघड जात आहे

ज्या शिव फुले शाहू आंबेडकरांनी हा महाराष्ट्र घडवला त्याच महाराष्ट्रात आज स्वतःच्या स्वार्थापोटी सामान्य जनतेचा मताचा उपयोग करून त्यांची दिशाभूल केली जात आहे.यावर सर्वसामान्य नागरिक कोड्यात अडकून गेला आहे की नेमकं करायचं काय.? एकीकडे महागाई देशामध्ये वाढत आहे तरुण युवकांना रोजगार नाही ज्या कंपनी होत्या त्या विदेशी पाठवून या सरकारने आधीच जनतेची गळा आवळून ठेवला आहे.

आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला सुद्धा प्रश्न पडला आहे की चांगल्या माणसाला साथ द्यायची म्हणून आपण पुढाकार करतो तोच माणूस आपला उपयोग करून पुढे स्वतःची पोळी भाजून घेतो यामुळे खरा सामाजिक कार्यकर्ता सुद्धा दुर्बळ होत चालला आहे. यामुळे माझा एक सांगणं आहे की जनतेने आता सावध झालं पाहिजे ज्या लोकांनी आपल्या मताचा उपयोग करून स्वतःची पोळी वाजले आहे त्याला तोंडावर पडला पाहिजे त्या व्यक्तीला दाखवून दिलं पाहिजे जनता जशी वर घेऊ शकते तशीच खाली आणू शकते तरच महाराष्ट्राचे राजकारण स्थिर राहील आणि सर्व सामाजिक कार्यकर्त्याला संघटनांना एक विनंती करतो की गट तट बाजूला ठेवून तत्त्वाच्या राजकारणासाठी सर्वांनी एकत्र यायला पाहिजे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button