महाराष्ट्र

उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यां ची निवड संपन्न तसेच हाजी मोईन खान यांची उपजिल्हाप्रमुख पदी निवड

उपसंपादक ———हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो .97 30 867 448

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे तसेच शिवसेना नेते युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून. उस्मानाबाद( धाराशिव) जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हास्तरीय विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आले असून त्या पुढील प्रमाणे

उस्मानाबाद(धाराशिव) जिल्ह्याचे नुतन सहसंपर्कप्रमुख नंदुभैय्या राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख (कळंब, वाशी, भुम, परांडा) रणजित ज्ञानेश्वर पाटील, शिवसेना जिल्हासंघटक (धाराशिव, तुळजापूर, लोहारा, उमरगा) दिपक जवळगे, शिवसेना जिल्हासंघटक (कळंब, वाशी, भुम, परांडा) दिलीप पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख (कळंब, वाशी) प्रदिप बप्पा मेटे , शिवसेना उपजिल्हाप्रमुख (भूम, परांडा) चेतन बोराडे, शिवसेना तालुकाप्रमुख (लोहारा) अमोल बिराजदार, शिवसेना शहरप्रमुख (धाराशिव) सोमनाथ आप्पा गुरव, शिवसेना कक्ष जिल्हाप्रमुख (धाराशिव) हाजी मोईन खान, शिवसेना उपजिल्हाप्रमुख (औसा, निलंगा) बजरंग जाधव. आदींची निवड करण्यात आली असून
यांच्या निवडीबद्दल शिवसेना खासदार ओम प्रकाश राजेनिंबाळकर , शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच नुतन पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या, यावेळी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न आपण सोडवाल.आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य कराल

तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहचवून शिवसेना संघटना बळकट कराल, असा विश्वास खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांनी व्यक्त केला. याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी, तालुकाप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, युवासेना पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, वरिष्ठ मित्र, ग्रामस्थ, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“टाइम्स 9 मराठी न्यूज” च्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button