क्रीडा

शंकरराव मोहिते महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योगादिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या खाशाबा जाधव इनडोअर स्टेडीयममध्ये घेण्यात आला होता.या कार्यक्रमासाठी योगशिक्षक गोरख डांगे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी,सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी यांना योगासने शिकवली.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना योग शिक्षक गोरख डांगे म्हणाले की,सध्याच्या धकाधकीच्या जीवनात माणसांना जर मनाला आनंद,शांती व समाधान हवे असेल योगासना शिवाय पर्याय नाही आहे.शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योगाचे महत्त्वाचे आहे.याप्रसंगी त्यांनी विविध योगासने व प्राणायामाची प्रात्यक्षिके करून दाखविली.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे,ज्युनिअर विभागाचे पर्यवेक्षक प्रा.राजकुमार इंगोले,शारीरिक शिक्षण संचालक प्रा.अरविंद वाघमोडे,राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख प्रा.नंदकुमार गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.दत्तात्रय मगर,प्रा.सज्जन पवार,प्रा.स्मिता पाटील,तसेच महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button