‘कारखान्याची चिमणी जमीनदोस्त; सोलापूरची विमानसेवा महिन्यात सुरू होणार’

कारखान्याच्या बेकायदेशीर चिमणी विरुध्द विचार मंचने चार ते पाच वर्षे न्यायालयीन लढाई लढून यश मिळवले.
सोलापूर: प्रतिनिधी :(रतन डोळे टाईम्स 9 मराठी )
सोलापूर : श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची अनधिकृत को जनरेशनची चिमणी पाडण्यात आली. त्यामुळे सोलापूर शहराचा विकासाचा मार्ग सुकर होणार आहे. सोलापूरच्या विकासाला, उद्योगधंद्यांना गरज असणारी विमानसेवा एक महिन्याच्या आत सुरू होणार आहे, अशी माहिती सोलापूर विचार मंचच्यावतीने डॉ. संदीप आडके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याप्रसंगी संवाद साधताना डॉ. आडके म्हणाले, सिद्धेश्वर साखर कारखान्याची को-जनरेशनची चिमणी पडल्यामुळे कारखान्याच्या गाळप हंगामावर कोणताही परिणाम होणार नाही. कारखान्यात अस्तित्वातील दोन जुन्या चिमण्यांवर प्रतिदिन पाच हजार टन क्षमेतेने गाळप होऊ शकते.
कारखान्याच्या बेकायदेशीर चिमणी विरुध्द विचार मंचने चार ते पाच वर्षे न्यायालयीन लढाई लढून यश मिळवले. चिमणीच्या राजकारणाबद्दल डॉ. आडके यांनी माहिती दिली. याप्रसंगी मंचचे विठ्ठल वठारे, डॉ. डायना आडके, रघुनंदन भुतडा आदी उपस्थित होते.
कारखाना दत्तक द्या
उत्तमरित्या चालवून दाखवूसिध्देश्वर कारखान्याची सूत्रे जबाबदार व्यक्तीकडे सोपवल्यास कारखाना भविष्यात वाचू शकतो. कारखाना आम्हाला चालवायला द्या, आम्ही कारखाना दत्तक घ्यायला तयार आहोत. येत्या हंगामापासून तो उत्तमरित्या चालवून दाखवू,असा दावा मंचच्या वतीने करण्यात आला.



