मनशांती आणि एकाग्रता यासाठी दैनंदिन जीवनात योग महत्त्वाचा -प्रा.धनंजय देशमुख
लक्ष्मीकांत कुरुडकर. अकलूज(प्रतिनिधी)
नियमितपणे योगाभ्यासाचा सराव केल्यास मनशांती, एकाग्रता व आत्मविश्वास विश्वास वाढीस लागतो असे प्रतिपादन आर्ट ऑफ लिव्हिंगचे आयुष मंत्रालय मान्यताप्राप्त योगशिक्षक प्रा. धनंजय देशमुख(एम ए योगशास्र) यांनी केले.
ते रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज येथे जागतिक योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते ते पुढे म्हणाले महाविद्यालयीन जीवनात विविध आसने,प्राणायाम सूर्यनमस्कार याची आवड निर्माण झाली तर शारीरिक आरोग्या बरोबरच मानसिक आरोग्य ही लाभते.यावेळी प्रा देशमुख यांनी विद्यार्थ्यांकडून सूक्ष्म व्यायाम, सूर्यनमस्कार,विविध आसने,ध्यान आणि योगनिद्रा प्रात्यक्षिकासह करून घेतली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य आर जी नलावडे, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख एस. आर. कांबळे ,सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डी.पी. बरकडे महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक प्रा. पी. एस. पांढरे व इतर शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सिमा सातपुते यांनी तर आभार ज्योती शिंगटे यांनी मानले.