महाराष्ट्र

शीखांप्रमाणे आता बौध्दांनाही शस्त्र परवाना द्याच!

उपसंपादक—— हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448

नांदेड जिल्ह्यातील बोंढार गावचे भीमसैनिक अक्षय भालेराव याने गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून जातीयवादी हैवानांनी १ जूनला सायंकाळी ७:३० वा. च्या दरम्यान त्याच्या पोटात खंजीर खुपसून खून केला. इतकेच नव्हे तर सैतानी मनोवृत्तीच्या जातीयवाद्यांनी हा खून करताना विकृतपणाचा कळस गाठला. अक्षय भालेराव याचे पोट फाडून त्याच्या पोटातील आतडी बाहेर ओढून काढली.

किती हा विकृतपणा? अन्याय करायलाही परिसीमा असते. जगभरात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असताना पुरोगामी महाराष्ट्रात मात्र जातीयवादी बांडगुळांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची किती एलर्जी? पण झुंडीने येऊन ग्रामीण भागातील आमच्या अल्पसंख्य असलेल्या बंधूंना क्रूरपणे मारणाऱ्या भडव्यांनो, आम्ही पण भीमा कोरेगांव घडविलेल्या शूर महार वीरांचे वंशज आहोत.

आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखविलेल्या भगवान गौतम बुध्दांच्या शांतीच्या मार्गाने वाटचाल करीत असलो तरी क्रांती करायला आम्हाला वेळ लागणार नाही. पण तेव्हा तुम्हाला पळता भुई थोडी होईल. जातीयवादी नामर्द साले खंजीर, तलवारी घेऊन महाराष्ट्रातील बौध्दांवर हल्ले करून त्यांची क्रूरपणे हत्या करीत असतील तर आता सरकारने शीखांप्रमाणे बौध्दांनाही स्वसंरक्षणासाठी शस्त्रपरवाने दिलेच पाहिजेत.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही पुरोगामी महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालायला लावणारे अन्याय अत्याचार महाराष्ट्रातील बौध्द समाजासह दलित समाजातील इतर जातींवर होताना दिसत आहेत. या अन्याय अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी १९८९ साली संसदेत एट्रोसिटी एक्ट कायदा पारित केला. परंतु या कायद्यालाही अलीकडच्या काळात जुमानले जात नाही. कारण दात, नखे व आयाळ काढलेल्या सिंहासारखी या कायद्याची अवस्था झाली आहे.

बौध्द समाज म्हणजेच पूर्वाश्रमीचा महार समाज हा पूर्वीपासूनच आक्रमक आहे. कारण त्यांच्या डीएनएला सल्फरचे कोटेशन आहे हे संशोधनात सिध्द झाले आहे. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महारांना भगवान गौतम बुध्दांचा शांततेचा मार्ग दाखविल्याने त्या वाटेवरून बौध्द समाज चालत आहे. म्हणजे तो क्रांती करायला विसरला असे मुळीच नाही. पण त्यांना धम्मपथाची एक वेसण आहे इतकेच! आज बौध्द समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखविलेल्या मार्गाने प्रगतीपथावर आहे.

आयएएस, आयपीएस, कलेक्टर, डॉक्टर, वकील, तहसीलदार यांसह मोठमोठ्या पदांवर बौध्द समाज विराजमान झाला आहे. तर अशिक्षीत, अल्पशिक्षीत असलेल्या बौध्दांची मुले उच्च शिक्षण घेत आहेत. त्यामुळे जातीयवाद्यांच्या पोटात गोळा उठत आहे. जयभीम म्हणत बौध्द समाज ताठ मानेने चालत असलेला पाहून जातीयवाद्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाताना मीही एकेकाळी अनुभवले आहे. यातूनच इतके भयानक हत्याकांड घडवले जात आहे.

अक्षय भालेराव याच्या निर्घृण हत्येनंतर महाराष्ट्रातील बौध्द समाजाने आरोपींना फाशी व्हावी अशी मागणी केलेली आहे. आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी या हत्याकांडानंतर खूपच आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर अनेक वकील सदरची केस लढण्यासाठी नांदेडमध्ये तळ ठोकून आहेत. ज्याठिकाणी मागासवर्गीयांची लोकसंख्या कमी आहे त्याठिकाणीच हे हिजडे अन्याय अत्याचार करतात. पण शहरी भागातील बौध्द बांधव तेथे पोचतात तेव्हा शेपूट घालून ते कुठल्या तरी बिळात जाऊन लपतात. आरे ला कारे म्हणून आम्हीही सूतासारखे सरळ करू शकतो.

पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखविलेला शांतीचा मार्ग आणि त्यांनी लिहीलेले संविधान यामुळे आम्ही संयम बाळगून आहे. पण आता काही काळ बुध्द बाजूला ठेवून युध्द करावेच लागेल असे वाटत आहे. कारण अंगावर येणाऱ्यांना शिंगावर आता घ्यावेच लागेल. कुणीही असो, आम्ही त्यास पुरून उरू! पण गावागावात आमचे अल्पसंख्य बौध्द बांधव आहेत त्यांना स्वसंरक्षणासाठी शस्त्रपरवाने दिलेच पाहिजेत. मग बघू, तुम्ही कसे यायचे तसे या! आम्ही तुम्हाला भारीच पडू हे मात्र निश्चित!

साभार —-गौतम भंडारे- संपादक, साप्ताहिक बंडखोर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button