चैतन्य विद्यालयात व श्री..सु.गो.दंडवते कनिष्ठ महाविद्याल सन 1999-2000 बॅचचे विद्यार्थी रमले आठवणीत.माजी विद्यार्थी व गुरू शिष्य कृतज्ञता मेळावा संपन्न

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल- 8378076123
येथील चैतन्य विद्यालयाच्या दहावी (तु.”ब”) च्या १९९९-२००० बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी गुरू-शिष्य कृतज्ञता मेळावाचे आयोजन केले होते.
विद्यार्थी व विद्यार्थींनींनी मिळून ३८ जणांनी जुन्या आठवणी, स्मृतींना, ती शाळा, तो वर्ग, सुंदर कौलारू, निरा नदी काठची इमारत, चिंचेंचे बन असणारे मैदान, शिकवणारे विषय शिक्षक, क्रिडा शिक्षक, वर्गशिक्षक, श्रीयुत कदमसर मुख्याध्यापक, श्रीयुत कोरांटकसर त्या वेळचे संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अनंत मनोहर सुरू सर(काका) संस्थेचे कार्यवाह व आजचे प्रमुख पाहुणे श्रीयुत प्रकाश सुरू सर (विश्वस्त लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्ट, शि.प्र.मंडळ जेष्ठ सदस्य मार्गदर्शक, अध्यक्ष विकास सार्व.वाचनालय) आठवणीनींना उजाळा दिला. सर्वजण २२ वर्षानंतर भेटले होते. त्यांना ओळखणे व आरे तुरेतुनगप्पा मारणे हा अविस्मरणीय व आनंदाचाभाग होता. सर्वजण ३५ ते ३६ वयाचे यशस्वी पालक होते.

शेती, व्यावसाय, उद्योग, नोकरी, ठेकेदारी, दुग्धव्यवसाय, राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, बँकेतील नोकरी, धार्मीक कार्यक्रमात सहभागी होणारे आपपल्या क्षेत्रात उंच भरारी घेणारे माजी विद्यार्थी एकत्र आले होते..
स्नेह मेळाव्याची सुरवात प्रथमत: बेल देऊन सर्व माजी विद्यार्थी वर्गात एकत्र आले वर्गात आले त्यांनी राष्ट्रगीत (जन-गण) व सरस्वती स्तोत्र सामुहीक गायीले तसेच सरस्वतीच्या फोटोचे पुजन केले. माजी विद्यार्थी तात्यासो कांबळे यांनी सुविचार सांगीतला. वर्गशिक्षक श्रीयुत रामदास कदम सर यांनी हजेरी घेतली. गैरहजर विद्यार्थ्यींची चौकशी केली. कालचा अभ्यास पुर्ण केला का? विचारणा केली तसेच हजेरी घेताना विद्यार्थांना आनंद होत होता.
विशेष म्हणजे या विद्यार्थी बॅचेने चैतन्य विद्यालयास कंपाऊड होते त्याला मोठे लोखंडी गेट (प्रवेश द्वार लोखंडी) बसवुन दिले आहे. खरंच फार मोठी आणि उपयुक्त गरज असलेली वास्तू रुपात देणगी दिली. त्यांचे उद्घाटन प्रमुख पाहुणे प्रकाश सुरु सर व सर्व सेवानिवृत्त शिक्षक, मुख्याध्यापक धनंजय दुनाखे (माजी मेळावा कार्यक्रमांचे अध्यक्ष) गोरख लोखंडे सर (प्राचार्य चैतन्य विद्यालय व श्री.सु.गो.दंडवते कनिष्ठ महा.), शि.प्र.मंडळ खजिनदार मगनशेठ क्षीरसागर, जेष्ठ सदस्य प्रशांत दंडवते, सदस्य शामराज दंडवते, सामाजिक कार्यकर्ते व अध्यात्मक मंडळाचे डाॅ.अरूण वैद्य, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर, माजी विद्यार्थी, परिवार उपस्थित होते..
यानंतर माजी विद्यार्थीनी भारती मस्के, शुभांगी मस्के, चमेली रानमाळ, शिंदे, रविंद्र मस्के, परमेश्वर भोई, संतोष इंगळे, गणेश ताटे देशमुख, सुनिल पराडे, नानासाहेब पवार या माजी विद्यार्थी यांनी गुरूजनांबद्दल कृज्ञता, शाळेच्या जुन्या आठवणी विषयशिक्षकांचे कौतुक केले. चैतन्य विद्यालयामुळे आणि तत्कालीन गुरूजनामुळे आम्ही घडलो. ज्ञान, विज्ञान, सुसंस्कार मिळाले. जगाच्या व्यावहारामध्ये आम्ही टिकलो.! सेवानिवृत्तशिक्षक खंडाळेसर, पवारसर, कदमसर, सय्यद सर, मुख्याध्यापक गोरख लोखंडेसर, प्रमुख पाहुणे प्रकाश सुरू सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय मनोगतात धनंजय दुनाखे यांनी आई -वडील -गुरूजन यांचा सन्मान करा, आदर्श नागरीक म्हणून आपली कर्तव्ये पार पाडा तसेच या शाळेसाठी लोखंडी गेट बसवून फार मोठे योगदान दिले आहे. भावी आयुष्यात माझी शाळा म्हणून सहकार्य करा.!! “शाळा ही सुखाची सरीता ज्ञानांची अखंड गंगा, भाग्याची देवता व स्मृतीची ठेव आहे” असे समजून जुन्या स्मतींना २२ वर्षानंतर उजाळा दिला.! कार्यक्रमाचे आभार माजी विद्यार्थी तात्यासो कांबळे यांनी मानले. सुत्रसंचालन संतोष इंगळे, परमेश्वर भोई यांनी केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी गणेश ताटे, परमेश्वर भोई, भारती मस्के, शुभांगी मस्के, सुनील पराडे, तात्यासो कांबळे, संतोष इंगळे, कृष्णा बनसोडे, भारत इंगळे, प्रशांत कुलकर्णी, निळकंठ दळवी, शरद मस्के, रविंद्र मस्के यांनी सहकार्य व कष्ट घेतले.



