महाराष्ट्र

आषाढी सोहळा तोंडावर आला तरी पंचवीस चार ते माळखांबी रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

बी टी शिवशरण

आषाढी वारी तयारी बाबत गेले महिनाभर सोलापूर जिल्हा प्रशासन माळशिरस तालुक्यात पालखी सोहळ्याची तयारी पहाणी करत आहे जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हाधिकारी प्रांत तहसीलदार तसेच सर्व खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांचे पहाणी दौरा सातत्याने सुरु आहेत मात्र जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पूर्वापार पालखी सोहळा अकलूज मुक्कामाहून माळीनगर मार्गे पंचवीस चार महाळुंग श्रीपूर बोरगाव माळखंबी तोंडले असा पायी सोहळा होत असतो यंदाची आषाढी वारी दहा जून ला सुरु होत आहे

परंतु या मार्गांवरील रस्ता खाचखलगे खडी उघडी पडलेली असा आहे पक्का व कायमस्वरूपी पालखी रस्ता का केला जात नाही अशी विचारणा नागरिकांतून केली जात आहे दर वर्षी पालखी आली कीं तात्पुरता रस्ता खड्डे भरले जातात म्हणजे पाठीभर खडी आणि चमचा भर डांबर अश्या पद्धतीने थातूर मातुर काम करुन डागडुजीची काम केली जातात पुढे पालखी गेली कीं मागे रस्ता पुन्हा उघडा अशी दरवर्षीची बोंब आहे त्या पेक्षा कायम स्वरूपी पक्का रस्ता करुन दरवर्षी त्याच रस्त्यावर तीच कामे करुन शासनाचा पैसा उधळपट्टी व जनतेच्या डोळ्यात धुळफेक तरी थांबल महाळुंग ते श्रीपूर कॉर्नर धोकादायक वळण व नेहमी खड्डेमय रस्ता आहे यावर उपाय योजना गरजेची आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button