महाराष्ट्र
अकलुज येथील सामाजिक कार्यकर्ते पै.यशवंत( आबा) कळसाईत यांना ” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर “पुरस्कार प्रदान.

उपसंपादक------ हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
अकलूज येथील विश्वकर्मा युवक संघटनेचे अध्यक्ष पैलवान यशवंत आबा कळसाईत यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय व भरीव कार्य केल्याने माळीनगर येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती समारंभ समितीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दादा माने पाटील यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला

याप्रसंगी माजी आमदार रामहरी (आप्पा) रुपनवर ,अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे -संचालक, उत्तमराव जानकर.दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे चेअरमन -राजेंद्र गिरमे ,शिवसेनेचे नेते -नामदेव (नाना )वाघमारे सोमनाथ (भाऊ) हुलगे सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे -उपाध्यक्ष, अण्णासाहेब शिंदे, प्रदीप (मामा) जगदाळे होलार समाजाचे नेते- नंदकुमार केंगार आदी मान्यवर उपस्थित होते



