डहाणू सेंट मेरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश…. युक्ती विजय पाटील 97.80% गुण मिळवून सर्वप्रथम

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत.
डहाणू तालुक्यातील सेंट मेरी हायस्कूल या शाळेचा 2023 रोजीचा दहावीचा निकाल 100% लागला असून या शाळेतून 97.80% टक्के गुण मिळून युक्ती विजय पाटील हिने प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक हर्षल रवींद्र बारी 95% टक्के आणि तिसरा क्रमांक रिया जयेश प्रजापती हिने 94.80 % टक्के गुण मिळवून घवघवीत यश प्राप्त केले आहे. त्यांच्यासह या शाळेतील 255 विद्यार्थ्यांनी देखील या परीक्षेत यश प्राप्त करून शाळेची 40 वर्षाची 100% टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.

पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील सेंट मेरी हायस्कूल या शाळेतून दहावीच्या 2023 रोजी झालेल्या परीक्षेसाठी 258 विद्यार्थी परीक्षेला बसले होते यापैकी डहाणू आगर उन्नती मंडळ येथील राहणारी युक्ती विजय पाटील हिने 100 पैकी 97.80% गुण मिळवून सेंट मेरी हायस्कूल या शाळेमध्ये सर्वप्रथम क्रमांक पटकावला आहे तर हर्षल रवींद्र बारी यांनी 95% गुण मिळवून दुसरा क्रमांक आणि रिया जयेश प्रजापती हिने 94.80% गुण मिळवून तिसऱ्या क्रमांकाचे यश संपादन केले आहे

त्यांच्या सोबत या परीक्षेला बसलेल्या 255 विद्यार्थ्यांनी देखील यश संपादन करून या शाळेची 40 वर्षाची 100 % टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. या परीक्षेदरम्यान या शाळेचे शिक्षक श्री.लक्ष्मीकांत भंडारी यांनी उपकेंद्र संचालनाची भूमिका पार पडली सेंट मेरी या हायस्कूलचे सचिव ॲडव्होकेट चंद्राजी बोथरा आणि सहसचिव श्री.हेमंत पांचाळ तर मुख्याध्यापिका सौ. मॉली नंदी आहेत.



