महाराष्ट्र

सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल नूरजहाँ शेख व दिपाली सोलंनकर यांना महाराष्ट्र पुरस्कृत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार प्रदान.

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

महाराष्ट्र शासन पुरस्कृत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल गणेशगाव ता. माळशिरस येथील कवयित्री लेखिका व फिनिक्स इंग्लिश स्कूलच्या संचालिका नुरजहाँ फक्रुद्दीन शेख आणि दिपाली युवराज सोलंनकर यांना यांना पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर महिला सन्मान पुरस्काराने गणेश गावच्या सरपंच -उषा रामचंद्र ठोंबरे उपसरपंच बाळू भीमराव ठोकळे व ग्रामसेविका लता घुले यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

याप्रसंगी गणेश गाव ग्रामपंचायत चे सदस्य शोभा विठ्ठल नलावडे, राहिना नजीर शेख ,पोपट विठोबा रुपनवर ,मंगल रामचंद्र मदने, सदाशिव जगन्नाथ शेंडगे, तसेच डाॕ .युवराज सोलनकर, दादासाहेब नलावडे, रामचंद्र ठोंबरे, कुंडलिक शेंडगे, हनुमंत सोलंनकर ,नजीर शेख, नागेश ठोंबरे ,पोलीस पाटील भाईसाब शेख ,वसंत ठोकळे ,बाळासाहेब रुपनवर, सिद्धेश्वर रुपनवर, तुकाराम नलावडे ,ज्योतीराम नलावडे ,नसरुद्दीन शेख ,गणेश यादव ,माऊली मदने ,डॉ. युवराज सोलंकर इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते

हा पुरस्कार प्राप्त केल्यानंतर सत्काराला उत्तर देताना प्राध्यापिका नूरजहाँ शेख म्हणाल्या की आपण सर्व ग्रामस्थ सर्व महामानवांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करत असतो ही अभिमानाची बाब आहे मात्र सर्व महा मानवांची जयंती साजरी करत असताना महिलांचा सहभाग अत्यल्प दिसून येत आहे त्यामुळे महिलांनी तितक्याच उत्साहाने सहभागी होणे काळाची गरज आहे तसेच महामानवांना कोणीही जातीच्या चौकटीत बंदिस्त करू नये महामानवांचे कार्य संपूर्ण समाजासाठी व सर्व जाती जमातीसाठी उल्लेखनीय आहे

मग आपण आपल्या उत्तुंग विचारांना जातीच्या भिंतीमध्ये का बंदिस्त करायची महामानवांचे जयंती साजरी करत असताना त्यांचे आचार विचार आचरणात घेण्याऐवजी त्यांच्या जयंतीनिमित्त डीजेच्या तालावर दारू पिऊन विक्षिप्तपणे नाचण्यापेक्षा या महा मानवांच्या आदर्श विचारांवर चालण्याचा प्रयत्न करणे हाच खरा जन्मोत्सव साजरा केल्याचे सार्थक होईल आणि ही काळाची गरज आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button