अहिल्यादेवी होळकर यांची २९८वी जयंती परीसरात साजरी.

सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल आशासेविका रफिया तांबोळी यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार’ देवून गौरविण्यात आले.
बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल – 8378076123
पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंती परीसरात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने आशासेविका, अंगणवाडी सेविका आदिंचा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार’ देवून सन्मानित करण्यात आले.

बावडा ग्रामपंचायत येथे झालेल्या कार्यक्रमात सरपंच किरण पाटील यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी उपसरपंच निलेश घोगरे, दादासो कांबळे, अंकुश शेंडगे, चंद्रकांत घोगरे, सौ. सारिका कांबळे, सौ. सिंधू गायकवाड, ग्रामसेविका अंबिका पावसे आदी मान्यवर उपस्थित होते.
शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने ग्रामीण भागात सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगादानाबद्दल ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार’ आशासेविका सौ रफिया शौकत तांबोळी व अंगणवाडी सेविका बेबी ढवळसकर यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, शाल, हार देवून सरपंच किरण पाटील, उपसरपंच निलेश घोगरे व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी जालींदर गायकवाड, चिंतामणी गायकवाड, रमेश जाधव, सतीश साबळे, उत्तम मोहिते, बापू सोनवणे, विशाल कांबळे, सतीश कांबळे, आबा पिसे आदि मान्यवर उपस्थित होते.

त्याचप्रमाणे पिंपरी बुद्रुक येथील आशासेविका स्वाती पाटील, मदतनीस नागर पाटील, ओझरे येथील आशासेविका रूपाली चव्हाण, गोंदी येथील आशासेविका सुरेखा क्षिरसागर, गिरवी येथील आशासेविका पुष्पा ठोकळे, अंगणवाडी सेविका ठोकळे, टणू येथील आशासेविका मालन जगताप, बळते मॅडम, लुमेवाडी येथील आशासेविका रेशमा सय्यद, बशीरा शेख, नरसिंहपूर येथील अंगणवाडी सेविका संगिता देवळे, बचत गटाच्या प्रमुख अनघा कोळी आदिंना शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार’ देवून गौरविण्यात आले.

पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ आयुष प्रसाद यांनी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार’ सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल आशासेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचतगट आदिंना यापुढील काळात अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त देण्यात येणार आहेत.



