महाराष्ट्र

कनगरा ता. जि.उस्मानाबाद येथील “रंजना सिद्ध गणेश” व “सुनंदा इंगळे” यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार प्रदान

उपसंपादक—— हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

कनगरा ता. जि. उस्मानाबाद येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सामाजिक न्यायाची प्रणेती रणरागिनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कनगरा येथील कर्तबगार महिला रंजना अरुण सिद्ध गणेश व सुनंदा तुळशीराम इंगळे यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कनगरा गावचे सरपंच मधुकर गंगणे व उपसरपंच सुरज इंगळे यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र शासन पुरस्कृत पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर महिला सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सन्मानपत्र ,सन्मानचिन्ह ,शाल व श्रीफळ तसेच प्रत्येकी 500 रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या पुरस्कार प्रदान कार्यक्रमास कनगरा गावचे सरपंच -मधुकर गंगणे ,उपसरपंच- सुरज दादाराव इंगळे ग्रामसेवक– शिवाजी बोचरे ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्तीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष विविध कार्यकारी विकास सोसायटीचे चेअरमन –व्हाईस चेअरमन सर्व सदस्य कनगरा गावचे प्रतिष्ठित ग्रामस्थ महिलावर्ग व अंगणवाडी सेविका आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button