महाराष्ट्र

देहू – पंढरपूर पालखी मार्गाचे काम अद्याप अपूर्णच वारकऱ्यांचा प्रवास खडतर

माळीनगर प्रतिनिधी………रियाज मुलाणी मो. 99 21 500 780

काही दिवसात भगवी पताका व मुखात विठुरायाचे नाव असेल डोळे पंढरीकडे असतील पण या वारकऱ्यांच्या पायाखालचा रस्ता मात्र खडतरच असणार आहे. याला एकमेव कारण म्हणजे सरकारचा गलथानपणा झाडांची झालेली कत्तल, ओसाड पडलेले माळरान, आग ओकणारा सूर्य, 10 जूनला तुकोबांची पालखी देहूतून प्रस्थान करेल विठुरायाचा गजर करत वारकरी अनवाणी प्रवास करतील पण या मार्गाच्या वेदना वारकऱ्यांना सोसाव्या लागतील 8 सप्टेंबर 2021 ला मोठ्या थाटात बॅनरबाजी करत रस्त्याचे काम सुरू झाले

मागील आषाढीलाच हे काम पूर्ण होईल असे आश्वासन देण्यात आले मात्र वर्ष उलटले तरी अद्याप काम पूर्ण झालेले नाही जुन्या रस्त्याच्या आजूबाजूला दाट वनराई होती ज्यात वड, पिंपळ, चिंच, यासारखी भली मोठी जाडी होती तिच्या सावलीत वारकरी विसवायचे पण पालखी मार्गाच्या नावाखाली ही सगळी झाडे तोडली गेली आता विसाव्याला जागा आहे ना पायी चालणाऱ्यांसाठी चांगला रस्ता मग असा मार्ग काय कामाचा असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे यावर्षीही उन्हाचे चटके सोसत ही वारी पंढरपूर पर्यंत वारकऱ्यांना पोहोचवावी लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button