प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे यांना दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय संस्थेचा ‘उत्कृष्ट प्राचार्य’ पुरस्कार प्रदान..

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448
अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दत्तात्रय बागडे यांना दिल्ली येथील “कॉमर्स ऑलिंपियाड फाऊंडेशन” या संस्थेचा शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल “उत्कृष्ट प्राचार्य” पुरस्कार देऊन दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचे शुभ हस्ते प्रदान करण्यात आला. ट्रॉफी व प्रमाणपत्र हे पुरस्काराचे स्वरुप होते हा पुरस्कार प्राचार्य दत्तात्रय बागडे यांनी ज्युनिअर आणि सिनिअर विभागातील शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात आला आहे.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अकलूज शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे मार्गदर्शक जयसिंह मोहिते पाटील , शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील , संचालिका स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी अभिनंदन केले.तसेच संस्थेचे सचिव .अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील तसेच महाविद्यालयातील विविध विभागांचे प्रमुख आणि प्राध्यापक, कार्यालय अधीक्षक .युवराज मालुसरे, ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक इंगोले आर.के.,प्रा.पराडे अनिल , प्रा.अविनाश जाधव, प्रा.गोरे सचिन , प्राध्यापिका.सुलक्षना देशमुख, पद्मावती रहाटे, नवले रुपाली व प्रशासकीय कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन करून हार्दिक शुभेच्छा दिल्या.



