महाराष्ट्र

डहाणू येथील मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या प्राचार्यांना त्वरित अटक करा…राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष काशिनाथ चौधरी यांची मागणी

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत

पालघर जिल्ह्यातील डहाणू धुंदलवाडी येथील वेदांत मेडिकल कॉलेज मधील प्राचार्यांनी विद्यार्थीला डॉक्टरी प्रथम वर्षातील परीक्षेत पास करण्यासाठी शरीर सुखाची मागणी केली होती. याबाबत या मुलीने या प्राचार्यांच्या विरोधात 25 मे 2023 रोजी कासा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.

या तक्रारीवरून कासा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे यांनी या प्राचार्यांच्या विरोधात कासा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. परंतु या प्राचार्यांना आज – तगायत अटक न करण्यात आल्यामुळे या प्राचार्यांना त्वरित अटक करून त्यांनी या आधीही डहाणू धुंदलवाडी वेदांत मेडिकल कॉलेजमध्ये असे निंदनीय कृत्य अन्य विद्यार्थिनी सोबत केले आहे का ? याबाबतचा अधिक तपास करून या प्राचार्यांना त्वरित अटक करण्यात यावे

असे निवेदन कासा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे यांना सोमवार दिनांक 29 मे 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे डहाणू तालुका अध्यक्ष काशिनाथ चौधरी, माजी सभापती स्नेहलता सातवी,महिला अध्यक्षा सुमन राबड, जिल्हा परिषद सदस्या लतिका बालशी,माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री केणी,विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष सचिन भोनर, तवा ग्रामपंचायत सरपंच लहू बालशी व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते यांनी दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button