क्रीडामहाराष्ट्र

रोमांचक खेळात – माहीच्या चेन्नई किंग ने सलग पाचव्यांदा आयपीएल चषकावर कोरले नाव.गुजरातवर पाच गडी राखून दणदणीत विजय

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448

मागील ५६ दिवसांपासून भारतातील बारा शहरांमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२३चा अंतिम सामना रविवारी (२८ मे) खेळला जाणार होता. मात्र सलग पाच तास झालेल्या मुसळधार पावसामुळे हा सामना राखीव दिवशी म्हणजे सोमवारी (२९ मे) खेळण्यात येत आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. आयपीएल २०२३च्या अंतिम फेरीत आज गतविजेत्या गुजरात टायटन्सचा सामना चार वेळा चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्जशी होत आहे. सोमवारी चेन्नईचा कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातची सुरुवात चांगली झाली. ऋद्धिमान साहा आणि शुबमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली. शुबमनला सातव्या षटकात महेंद्रसिंग धोनीने रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर यष्टिचित केले. त्याला २० चेंडूत ३९ धावा करता आल्या. यामध्ये सात चौकारांचा समावेश आहे. यानंतर ऋद्धिमान साहा आणि साई सुदर्शन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी केली. दरम्यान, साहाने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याला दीपक चाहरने धोनीच्या हाती झेलबाद केले. साहा ३९ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५४ धावा करून बाद झाला.

यानंतर सुदर्शन आणि कर्णधार हार्दिकने तिसऱ्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी केली. सुदर्शनने अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी करत ४७ चेंडूत ९६ धावा केल्या. आयपीएल २०२३ मधील हे त्याचे तिसरे अर्धशतक होते. सुदर्शनचे शतक हुकले. २०व्या षटकात मथिशा पाथिरानाने त्याला एलबीडब्ल्यू आऊट केले. डावाच्या शेवटच्या चेंडूवर राशिदला पाथिरानाने ऋतुराज गायकवाडला झेलबाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. हार्दिकने १२ चेंडूत दोन षटकारांच्या मदतीने नाबाद २१ धावा केल्या. चेन्नईकडून पाथिरानाने २ विकेट्स घेतल्या. त्याचवेळी दीपक चाहर आणि जडेजा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. तुषार देशपांडे चांगलाच महागात पडला. त्याने चार षटकात ५६ धावा लुटल्या.

गुजरात टायटन्सने शानदार फलंदाजी करताना २० षटकांत ४ गडी गमावून २१४ धावा केल्या. आयपीएल फायनलमधील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी २०१६ मध्ये सनरायझर्स हैदराबादने २० षटकांत ७ बाद २०८ धावा केल्या होत्या. चेन्नईला पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन बनण्यासाठी विक्रमी धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. यापूर्वी आयपीएल फायनलमध्ये २०० धावांचा पाठलाग फक्त एकदाच झाला होता. २०१४ साली कोलकाताने फायनलमध्ये पंजाबसमोर २०० धावांचे आव्हान ठेवले होते. यापेक्षा जास्त धावांचा पाठलाग कधीच केला गेला नाही. गुजरातकडून साई सुदर्शनने तुफानी खेळी केली. त्याचे शतक जरी हुकले असले तरी त्याच्या या खेळीच्या जोरावर गुजरातने चेन्नईला अंतिम सामन्यात अडचणीत आणले आहे. त्याने ४७ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ९६ धावा चोपल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button